Ved Movie : रितेश देशमुखमुळेच अजय -अतुलला 'अग्निपथ' मिळाला चित्रपट, खुद्द संगीतकारानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 02:02 PM2022-12-23T14:02:51+5:302022-12-23T14:03:46+5:30

Ved Movie : 'वेड' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया डिसूझा, शुभंकर तावडे आणि संगीतकार अजय-अतुल यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अजय-अतुलने रितेशचे कौतुक केले.

Ved Movie : Ajay-Atul got the film 'Agnipath' because of Riteish Deshmukh, revealed by the composer himself | Ved Movie : रितेश देशमुखमुळेच अजय -अतुलला 'अग्निपथ' मिळाला चित्रपट, खुद्द संगीतकारानेच केला खुलासा

Ved Movie : रितेश देशमुखमुळेच अजय -अतुलला 'अग्निपथ' मिळाला चित्रपट, खुद्द संगीतकारानेच केला खुलासा

googlenewsNext

जगात असे काही लोक असतात, जे स्वतः मोठे होतात आणि आपल्या यशाच्या प्रवासात आपल्यासोबत इतरांनाही सहभागी करून घेतात. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अशा लोकांपैकीच आहे. रितेशचा आगामी चित्रपट वेड  (Ved Marathi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून रितेश आणि जिनिलिया (Genelia D'souza-Deshmukh) बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे.  हे दोन्ही कलाकार आपल्या वेड चित्रपटाच्या टीमसह द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी, अभिनेता शुभंकर तावडे आणि संगीतकार जोडी अजय-अतुल (Ajay-Atul) यांचा समावेश होता.  

या धमाल-मस्ती आणि हास्य-विनोदाने भरलेल्या भागात कपिल शर्मा अजय-अतुलला रितेशशी त्यांचे इतके दृढ नाते असण्यामागचे कारण विचारेल. या नात्याबद्दल बोलताना अतुल म्हणाला, मी नेहमी ही गोष्ट सांगतो. असं नाहीये की रितेश नेहमी आमच्याकडे येतो किंवा आम्ही त्याच्याकडे जातो. उलट, तो आम्हाला त्याच्यासोबत नेतो. आमच्या संगीत प्रवासात आमच्या नावाची शिफारस निर्मात्यांकडे करून रितेशने आम्हाला जी मदत केली आहे, तशी इतर कुणीच केली नसती. 


तो पुढे म्हणाला की, मला अजून आठवते आहे, २०१०-११ च्या काळात रितेश आमचे नाव निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना सुचवीत असे. तो फक्त आमचे नाव सुचवून थांबत नसे तर त्यांना आमचे संगीत ऐकवत असे आणि मग असे सांगत असे की आम्ही जर त्यांच्या चित्रपटाला न्याय देऊ शकू असा विश्वास त्यांना असला, तर त्यांनी आम्हाला काम द्यावे. आणि हो, अग्निपथ चित्रपट आम्हाला रितेशमुळेच मिळाला. रितेशने आमचा परिचय धर्मा प्रॉडक्शन्स, दिग्दर्शक करण मल्होत्रा आणि निर्माता करण जोहरशी करून दिला. त्याने केवळ आमची शिफारस केली नाही, तर आमचे संगीत एका सीडीवर घेऊन अर्धा तास त्यांच्यासोबत बसून त्यांना आमचे संगीत ऐकवले. त्यानंतर आम्ही अनेक चित्रपट केले, पण अग्निपथचे यश विशेष होते. अग्निपथमुळे आम्हाला स्वतंत्र, विशिष्ट ओळख मिळाली. पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी रितेशने आम्हाला मदत केली.


अतुलच्या शब्दांनी सद्गदित झालेला रितेश म्हणाला की, त्यांच्या प्रतिभेमुळे ते झळकले. त्यांना यश मिळाले ते केवळ त्यांच्या कठोर परिश्रमामुळे!  रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित वेड (Ved Marathi Movie) हा मराठी चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. 

Web Title: Ved Movie : Ajay-Atul got the film 'Agnipath' because of Riteish Deshmukh, revealed by the composer himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.