​वंदना पाठक या कारणामुळे करतेय कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 14:52 IST2016-10-25T14:34:56+5:302016-10-25T14:52:27+5:30

साथ निभाना साथिया या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण देण्यासाठी मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे. या मालिकेत दुसऱ्या ...

Vandana Pathak is the reason behind the fallback | ​वंदना पाठक या कारणामुळे करतेय कमबॅक

​वंदना पाठक या कारणामुळे करतेय कमबॅक

थ निभाना साथिया या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण देण्यासाठी मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे. या मालिकेत दुसऱ्या कोणाची नव्हे तर वंदना पाठकची रिएंट्री होणार आहे. वंदनाने हम पाच, खिचडी यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. तिने या मालिकेत पूर्वी गौरी ही भूमिका साकारली होती. गौरीच्या व्यक्तिरेखेला देण्यात आलेली वळणे वंदनाला न आवडल्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. गौरीच्या स्वभावात तसेच तिच्या व्यक्तिरेखेत खूप बदल झालेले दाखवण्यात आले होते. यामुळे गौरी ही व्यक्तिरेखा थोडी नकारात्मक झाली होती. ही गोष्ट वंदनाला पटत नसल्याने तिने ही मालिका सोडली होती. यामुळे दुर्गाच्या खुनाबद्दल पोलिस तिला अटक करतात असे मालिकेत दाखवून तिची व्यक्तिरेखा संपवण्यात आली होती. या मालिकेनंतर काही दिवस तरी वंदना कोणत्याच मालिकेत झळकली नाही. पण आता ती पुन्हा एकदा साथ निभाना साथिया या मालिकेचा भाग असणार आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी वंदनाने परत यावे यासाठी तिची मनधरणी केली. वंदना आणि निर्मात्यांमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा झाली असून ती एका सकारात्मक भूमिकेद्वारे कमबॅक करणार आहे. सुडाची भावना विसरून ती घरी परतणार आहे. गौरी परतल्यानंतर सगळ्यांसमोर एक गौप्यस्फोट करणार आहे. यामुळे मालिकेत खूप सारे ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वंदनाने अद्याप या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली नसली तरी दिवाळीनंतर ती चित्रीकरणास प्रारंभ करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: Vandana Pathak is the reason behind the fallback