मौनी रॉयसाठी ही भूमिका ठरली टर्निंग पॉईंट?जाणून घ्या त्या भूमिकेविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 09:22 AM2017-09-26T09:22:19+5:302017-09-26T14:52:19+5:30

पौराणिक मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली मौनी रॉय आता बॉलिवूडमध्ये हिरोईन बनत आपली नवी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहे. पौराणिक ...

Turning Point for the role of Munni Roy? Know that role | मौनी रॉयसाठी ही भूमिका ठरली टर्निंग पॉईंट?जाणून घ्या त्या भूमिकेविषयी

मौनी रॉयसाठी ही भूमिका ठरली टर्निंग पॉईंट?जाणून घ्या त्या भूमिकेविषयी

googlenewsNext
राणिक मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली मौनी रॉय आता बॉलिवूडमध्ये हिरोईन बनत आपली नवी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहे. पौराणिक मालिका केल्यानंतर मौनीला नागिन या मालिकेसाठी भूमिका मिळाली. या मालिकेमुळे तिला छोट्या पडद्यावरची नागिन म्हणून ओळखली जाते मात्र आता ती नागिन नाहीतर आता बॉलिवूडची हिरोईन म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. आता मौनी रॉय अधिकच बोल्ड पाहायला मिळते. तिचे सोशल मीडियावर ती वेगवेगळे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आज मौनी रॉयला खूप चाहते फॉलो करतात तिची स्टाइल, तिच्या भूमिका, तिचे लूक्स सा-यांवर चाहते घायाळ होताना दिसतात. इतकी लोकप्रियता मिळवलेली मौनी रॉय तिच्या जुन्या भूमिकांनाही तिच्या करिअरमध्ये तितकेच महत्त्व देत असल्याचे दिसते.खरं तर मौनीने क्योंकी साँस भी बहु थी या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती.त्यानंतर जरा नच के दिखामध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती.देवों के देव महादेव,  बिग बॉस 8सिझन असे अनेक शोमधल्या भूमिकेतून मौनी स्वतःची छाप पाडली होती. त्या सगळ्या भूमिकांमुळेच आज मौनीला छोटा पडदा ते रूपेरी पडदा हा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. आज मौनी तिच्या भूमिकांमुळे नाहीतर तिच्या नावामुळे ओळखली जाते. आज पैसा,प्रसिध्दी आणि लोकप्रियता मिळवणे हे मौनीसाठी इतरांप्रमाणे आव्हानात्मक होते.मात्र देवो के महादेव या पौराणिक मालिकांमध्ये साकारलेली पार्वती ही भूमिका तिच्या करिअसरसाठी टर्निंग पॉईंट ठरली.वेगवेगळ्या भूमिकेतून छाप पाडणारी मौनीला आजही तिने साकारलेली पार्वती मनात घर करून आहे. त्यानंतर नागिन मालिकेत तिने साकारलेली भूमिकने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली.भूमिकेमुळे कालाकार हा समृध्द होत असतो त्यामुळे ज्या भूमिकासांठी मौनीला विचारले गेले तिने त्या भूमिकेचे सोने केले म्हणून त्यामुळे मौनी रॉयही आज जी काही आहे ते सर्व तिने साकारलेल्या भूमिकांमुळे असल्याचे मौनी सांगते.आता पौराणिक मालिकेनंतर बोल्ड बनलेली मौनी लवकरच 70 mm पडद्यावर गोल्ड बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मौनी रॉयचा हा सिनेमा रसिकांवर कितपत मोहिनी घालणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

(Also Read:​SEE PHOTO: निया शर्मा नव्हे तर मौनी रॉय आहे अधिक बोल्ड)

Web Title: Turning Point for the role of Munni Roy? Know that role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.