The Kapil Sharmaमधून स्टार झालेल्या या कलाकारावर आज आलीय रस्त्यावर चहा विकण्याची वेळ, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 04:02 PM2022-04-09T16:02:07+5:302022-04-09T16:02:37+5:30

The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा' शोमधील लोकप्रिय कॉमेडियन रस्त्याच्या कडेला चहा बनवताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

This Comedian From ‘The Kapil Sharma Show’ Quit Acting And Started Selling Tea Along The Way! VIDEO Viral | The Kapil Sharmaमधून स्टार झालेल्या या कलाकारावर आज आलीय रस्त्यावर चहा विकण्याची वेळ, व्हिडीओ होतोय व्हायरल

The Kapil Sharmaमधून स्टार झालेल्या या कलाकारावर आज आलीय रस्त्यावर चहा विकण्याची वेळ, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) बंद झाल्याच्या बातमीने चाहते निराश झाले आहेत. वीकेंडला गुदगुल्या करणारा तुमचा आवडता शो, लोक खूप मिस करणार आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे इंटरनेटवरचा एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा शोचा लोकप्रिय कॉमेडियन रस्त्याच्या कडेला चहा बनवताना दिसत आहे.

कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला, जो पाहून सगळेच थक्क झाले. सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला हातगाडीवर चहा का बनवत आहेत, असा विचार करून लोक चिंतेत आहेत. 

सुनील ग्रोव्हरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो गढवालमधील एका चहाच्या स्टॉलवर चहा बनवताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला टपरीवर उभा राहून सुनील अगदी साध्या पद्धतीने चहा बनवत आहे आणि दुकान मालक त्याच्या शेजारी उभा आहे आणि त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. त्याची चहा बनवण्याची स्टाइल सोशल मीडिया यूजर्सना पसंत केली जात आहे. या व्हिडिओवर भरपूर लाईक्सचा पाऊस पडत आहे.

व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

या व्हिडिओवर एका यूजरने लिहिले की, 'म्हणूनच तुम्ही माझे आवडते आहात'. सुनीलची ही स्टाईल बहुतेकांना पसंत पडत आहे. अशाच एका चाहत्याने त्याला लिहिले, मी तुझ्याइतका कोणाचाही मोठा चाहता नाही. तर तिथे एकाने कमेंट केली, 'मी तुझी कॉमेडी खूप मिस करत आहे'. काही काळापूर्वी सुनीलची बायपास सर्जरी झाली होती, पण आता तो नॉर्मल आहे आणि कामावर परतला आहे.

Web Title: This Comedian From ‘The Kapil Sharma Show’ Quit Acting And Started Selling Tea Along The Way! VIDEO Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.