n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">रियालिटी डान्स शो 'झलक दिखला जा-9' मध्ये स्पर्धक एकाहून डान्स परफॉर्मन्स सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करतायत. डान्सची ही स्पर्धा आता आणखी अटीतटीची होत जातेय. त्यातच आता चर्चा सुरु झालीय ती झलक दिखल जा-9 मधील वाईल्ड कार्ड एंट्री मारणा-यांची. या शोमध्ये फक्त बाल कलाकार वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री मारणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं काही बालकलाकारांची नावं सध्या चर्चेत आहेत. चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेत बाल अशोकाची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम या शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मारणार असल्याचं बोललं जातंय. याशिवाय इंडियाज बेस्ट ड्रामेबाजचे विजेते स्वस्ती नित्या आणि प्रीतज्योत, बालिका वधू फेम ग्रेसी गोस्वामी, डीआयडी लिटील-चॅम्प विजेता तेरीया मगर आणि उडान मालिकेतील स्पंदन चतुर्वेदी झलक दिखला जा-9मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मारणार आहेत. ये है मोहब्बते मालिकेतील बालकलाकार रुहिका धवनसुद्धा वाईल्ड कार्ड एंट्री मारणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता ती या शोचा भाग बनणार नसल्याचं निश्चित झालंय.