'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचा येणार सीक्वल?, ललित प्रभाकरच्या त्या पोस्टनं दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 01:37 PM2023-11-10T13:37:50+5:302023-11-10T13:38:30+5:30

Julun yeti Reshimgathi Serial : 'जुळून येती रेशीमगाठी'. या मालिकेत प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी झळकली होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

The sequel of 'Julun Yeti Reshimgathi' serial?, Lalit Prabhakar's post gave a hint | 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचा येणार सीक्वल?, ललित प्रभाकरच्या त्या पोस्टनं दिली हिंट

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचा येणार सीक्वल?, ललित प्रभाकरच्या त्या पोस्टनं दिली हिंट

छोट्या पडद्यावरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करतात. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'जुळून येती रेशीमगाठी'. या मालिकेत
प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी झळकली होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. यात प्राजक्ताने मेघनाची भूमिका साकारली होती तर ललित प्रभाकरने आदित्यची भूमिका निभावली होती. दरम्यान आता या मालिकेचा सीक्वल येणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. ही चर्चा ललितने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर सुरू झाली आहे.

ललित प्रभाकर याने इंस्टाग्रामवर प्राजक्ता माळीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, काढायचा का दुसरा भाग ?
जुळून येती रेशीमगाठी (नाम तो सुना होगा) जुळून येती रेशीमगाठी मालिकेला १० वर्ष पूर्ण झालीत. प्राजक्ता आणि ललितला एकत्र पाहून चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. 

अभिनेता सारंग साठे याने या पोस्टवर कमेंट केली की, तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसत आहात. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, तुमची मालिका सुरू झाली तर चॅनेलचा टीआरपी वाढेल. जुळून येती रेशीमगाठीचा सीक्वल यावा, असे चाहत्यांना वाटत आहे. या मालिकेत प्राजक्ता, ललित व्यतिरिक्त ललित आणि प्राजक्ता यांच्याबरोबरच मालिकेत सुकन्या कुलकर्णी, उदय टिकेकर, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, सायली देवधर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 
 

Web Title: The sequel of 'Julun Yeti Reshimgathi' serial?, Lalit Prabhakar's post gave a hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.