'तू चाल पुढं'मधील लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली मालिका; साकारत होती महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 13:35 IST2023-08-09T13:34:26+5:302023-08-09T13:35:12+5:30

Marathi actress:आतापर्यंत या मालिकेतील अश्विनी, श्रेयस, शिल्पी, प्राजू, मयुरी असे कितीतरी भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. यांच्यापैकीच एका लोकप्रिय अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे.

The popular actress from Tu Chal Pudham' quits the serial | 'तू चाल पुढं'मधील लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली मालिका; साकारत होती महत्त्वपूर्ण भूमिका

'तू चाल पुढं'मधील लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली मालिका; साकारत होती महत्त्वपूर्ण भूमिका

झी मराठीवरील तू चाल पुढं ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजत आहे. अश्विनीच्या आयुष्यात येणाऱ्या चढउतारांमुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका सुरु असल्यामुळे त्यातील कलाकार प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. परंतु, ही मालिका यशाच्या शिखरावर असतानाच त्यातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका सोडायचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत या मालिकेतील अश्विनी, श्रेयस, शिल्पी, प्राजू, मयुरी असे कितीतरी भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. यांच्यापैकीच एका लोकप्रिय अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे. या अभिनेत्रीने नुकतीच सोशल एक पोस्ट शेअर करत तिने मालिकेचा निरोप घेतल्याचं सांगितलं आहे. 'तू चाल पुढं' या मालिकेतील अश्विनीची खास मैत्रीण प्राजू अर्थात अभिनेत्री स्नेहा माजगांवकर हिने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. स्नेहाने ही मालिका नेमकी का सोडली यामागचं कारण अद्याप तरी समोर आलं नाही. परंतु, पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

'सिरिअल संपत नाहीये मी या पुढे सीरियल मधे नसेन…..', असं कॅप्शन देत तिने या मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सेटवर कशाप्रकारे काम चालतं हे तिने दाखवलं आहे. तसंच यापूर्वीही तिने एक पोस्ट करत प्रत्येक कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांसोबतचे फोटो शेअर केले होते.
 

Web Title: The popular actress from Tu Chal Pudham' quits the serial