लग्नानंतर दीड वर्षांनी 'तारक मेहता...' फेम सोनूने दिली गुडन्यूज, व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "आम्ही..."
By कोमल खांबे | Updated: May 6, 2026 10:39 IST2026-05-06T10:38:37+5:302026-05-06T10:39:02+5:30
गेल्यावर्षीच झीलने आदित्य दुबेसोबत लग्न करत तिच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. आता तिने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

लग्नानंतर दीड वर्षांनी 'तारक मेहता...' फेम सोनूने दिली गुडन्यूज, व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "आम्ही..."
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक गाजलेली मालिका. या मालिकेवर आजही प्रेक्षक तितकंच प्रेम करतात. या मालिकेत भिडे गुरुजींची मुलगी सोनूची भूमिका साकारून अभिनेत्री झील मेहताला लोकप्रियता मिळाली. गेल्यावर्षीच झीलने आदित्य दुबेसोबत लग्न करत तिच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. आता तिने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.
झीलने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये झील तिच्या पतीसोबत दिसत आहे. झीलच्या पोटावर त्या दोघांनीही हात ठेवल्याचं दिसत आहे. "तुमच्यासोबत काहीतरी खास शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत", असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून झील प्रेग्नंट असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. मात्र ती गरोदर नसून त्यांनी नवं घर खरेदी केल्याची गुडन्यूज अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आहे.
झीलच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिचं अभिनंदन केलं आहे. झील आणि आदित्य दुबे यांनी डिसेंबर २०२४मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न करत संसार थाटला. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. झील सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते.