'सुख म्हणजे...' फेम माधवी निमकरने मुंबईतल्या प्राइम लोकेशनवर खरेदी केलं दुसरं घर, फोटोतून दाखवली झलक
By कोमल खांबे | Updated: October 30, 2025 11:51 IST2025-10-30T11:50:38+5:302025-10-30T11:51:07+5:30
माधवीने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे. हे माधवीचं दुसरं घर आहे. मुंबईतील मालाडमध्ये माधवीने हे ड्रीम होम खरेदी केलं आहे.

'सुख म्हणजे...' फेम माधवी निमकरने मुंबईतल्या प्राइम लोकेशनवर खरेदी केलं दुसरं घर, फोटोतून दाखवली झलक
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका लोकप्रिय होती. या मालिकेत शालिनी ही खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री माधवी निमकर घराघरात पोहोचली. माधवीने साकारलेल्या शालिनीला चाहत्यांनी जेवढं ऑनस्क्रीन प्रेम दिलं तेवढंच अभिनेत्रीवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. माधवीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. माधवी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट्स देत असते. नुकतंच माधवीने एक खूशखबर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
माधवीने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे. हे माधवीचं दुसरं घर आहे. मुंबईतील मालाडमध्ये माधवीने हे ड्रीम होम खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर याचे काही फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. सध्या माधवीच्या या नव्या घराचं काम सुरू आहे. पण तिच्या या घरातून अख्ख्या मुंबईचं दर्शन घडत असल्याचं दिसत आहे. "काम सुरू आहे... दुसरं घर...तुम्ही मनापासून जे भरपूर प्रेम दिलं, आशीर्वाद दिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि अर्थात माझ्या आई आणि वडिलांचेही आशीर्वाद .. त्याचं हे फळ", असं म्हणत तिने सर्वांचे आभार मानले आहेत.
माधवीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही तिचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, माधवी तिच्या फिटनसेसाठीही ओळखली जाते. अभिनेत्री फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. तर अनेक योगा टिप्सही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.