सुहानी धानकी पोरस या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 15:13 IST2017-06-23T09:43:03+5:302017-06-23T15:13:03+5:30

सुहानी धानकीने पिया अलबेला, महाभारत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे तसेच ती अधुरी कहानी हमारी या चित्रपटात झळकली होती. ...

Suhani Dhadki Poras or the series | सुहानी धानकी पोरस या मालिकेत

सुहानी धानकी पोरस या मालिकेत

हानी धानकीने पिया अलबेला, महाभारत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे तसेच ती अधुरी कहानी हमारी या चित्रपटात झळकली होती. आता पोरस या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार आहे. 
पोरस ही बिग बजेट मालिका असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेच्या निर्मितीसाठी जवळजवळ 500 कोटी खर्च केले जात आहेत. ही मालिका अतिशय भव्य-दिव्य असणार आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकार देखील तितकेच ताकदीचे असावेत यासाठी मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. या मालिकेत पोरसच्या भूमिकेत लक्ष लालवाणी दिसणार आहे तर त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारण्यासाठी सुहानी धानकीची निवड करण्यात आली आहे. सुहानी या मालिकेत लच्छी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेसाठी अनेक कलाकारांनी ऑडिशन दिली होती. पण त्यामधून या भूमिकेसाठी सुहानीची निवड करण्यात आली. या भूमिकेविषयी सुहानी सांगते, लच्छी ही खूपच वेगळी मुलगी आहे. अतिशय खमकी, स्वतंत्र अशी ही मुलगी असून तिच्या भूमिकेला अनेक पैलू आहेत. ही भूमिका काहीशी विनोदी देखील आहे. तसेच ती अतिशय भावनाप्रधान मुलगी आहे आणि त्याचवेळी ती स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ आहे. ही भूमिका मला खूप आव्हानात्मक वाटल्यामुळे मी ही भूमिका स्वीकारली. 
पोरस या मालिकेचे चित्रीकरण सध्या थायलंडमध्ये सुरू आहे. सुहानीदेखील मालिकेच्या टीमसोबत तिथे चित्रीकरण करत आहे. थायलंडमध्ये महिनाभर चित्रीकरण केल्यानंतर मालिकेची टीम पुढील चित्रीकरणासाठी भारतात परतणार आहे. 
सुहानी एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आणि प्राध्यापिका असून डॉ.संध्या पुरेचा तिच्या गुरू आहेत. तसेच तिने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. 

Also Read : पोरस या मालिकेत लक्ष लालवाणी प्रमुख भूमिकेत

Web Title: Suhani Dhadki Poras or the series