शशांक केतकरची 'मुरांबा' मालिका हिंदीत येणार! अभिनेता म्हणतो, "आपल्या मालिकेचा रिमेक..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 12:56 PM2024-04-06T12:56:27+5:302024-04-06T12:57:02+5:30

'मुरांबा' मालिकेची लोकप्रियता पाहून ही मालिका हिंदीतही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

star pravah muramba tv serial hindi remake shashank ketkar shared post | शशांक केतकरची 'मुरांबा' मालिका हिंदीत येणार! अभिनेता म्हणतो, "आपल्या मालिकेचा रिमेक..."

शशांक केतकरची 'मुरांबा' मालिका हिंदीत येणार! अभिनेता म्हणतो, "आपल्या मालिकेचा रिमेक..."

टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिका. अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेतील रमा-अक्षय ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'मुरांबा' मालिकेमुळे प्रेक्षकांची दुपार गोड होते. प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम पाहून आता या मालिकेचा हिंदीत रिमेक केला जाणार आहे. 

'मुरांबा' मालिकेची लोकप्रियता पाहून ही मालिका हिंदीतही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदीतील या मालिकेचं नाव 'खट्टा मीठा प्यार हमारा' असं असणार आहे. नुकत्याच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये 'मुरांबा'मधील रमासारखीच दोन वेण्या घातलेली साधी मुलगी आणि तिची स्टायलिश मैत्रीण असलेली रेवाही दिसत आहे. तर अक्षयच्या भूमिकेत डॅशिंग अभिनेता दिसत आहे. स्टार प्लस वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अविनाश मिश्रा, प्रेरणा सिंग, आर्ची सचदेवा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

या मालिकेचा प्रोमो पाहून शशांक केतकर भारावून गेला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'मुरांबा' मालिकेचा हिंदीत रिमेक होणार असल्याचं म्हटलं आहे. "वॉव...आपल्या मालिकेचा हिंदीत रिमेक होणार हे ऐकल्यानंतर छान वाटतं," असं म्हणत त्याने या कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, 'मुरांबा' मालिकेत शशांक केतकरसह शिवानी मुंधेकर आणि निशाणी बोरुले मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत शिवानी रमाच्या तर निशाणी रेवाच्या भूमिकेत आहे. त्याबरोबरच सुलेखा तळवलकर, प्रतिमा कुलकर्णी, काजल काटे हे कलाकारही आहेत. 

Web Title: star pravah muramba tv serial hindi remake shashank ketkar shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.