'...म्हणून मला बिकनी आणि क्लीवेज दाखवणं सहज शक्य नाही'; 'जीजाजी छत पर कोई है'मधील अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:08 PM2021-05-25T12:08:38+5:302021-05-25T12:09:04+5:30

सिनेइंडस्ट्रीचा भाग असली तरी या अभिनेत्रीने आतापर्यंत कधीच रिव्हलिंग कपडे घातले नाहीत. यामागचे कारण नुकतेच तिने सांगितले आहे.

'... so it's not easy for me to show bikinis and cleavage'; Revealed by the actress in 'Jijaji Chhat Par Koi Hai' | '...म्हणून मला बिकनी आणि क्लीवेज दाखवणं सहज शक्य नाही'; 'जीजाजी छत पर कोई है'मधील अभिनेत्रीचा खुलासा

'...म्हणून मला बिकनी आणि क्लीवेज दाखवणं सहज शक्य नाही'; 'जीजाजी छत पर कोई है'मधील अभिनेत्रीचा खुलासा

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका जीजाजी छत पर कोई हैमधील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री हिबा नवाब सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि तिचा फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप आहे. दरम्यान हिबाने नुकतेच तिच्या कपड्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

हिबा नवाब सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. हिना तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. ती सिनेइंडस्ट्रीचा भाग असली तरी तिने आतापर्यंत कधीच रिव्हलिंग कपडे घातले नाहीत. यामागचे कारण नुकतेच तिने सांगितले आहे.

ती म्हणाली की, 'मी एका मुस्लीम कुटुंबातील आहे. आमच्याकडे संस्कृती वेगळी आहे. मी असेही माझ्या संस्कृतीचा विरोध करते. त्यामुळे या पुढे नाही जाऊ शकत. माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझे कपडे आवडत नाहीत. त्यांना वाटते की  मी वेगळ्या अंदाजातील कपडे घालावे. '


तिने पुढे सांगितले की, खरेतर मला वेबसीरिजमध्ये काम करायचे आहे. पण बोल्ड सीनमुळे मी विचार करते. यासाठी मला माझे कुटुंब पाठिंबा देतील. काही गोष्ट न करण्याचा माझा स्वतःचा निर्णय आहे.' 


हिबा सांगते की, माझ्याकडे जेव्हा कोणती ऑफर येते तेव्हा मी सर्वात आधी विचारते की कोणता किसिंग सीन किंवा बोल्ड सीन आहे, जर उत्तरात हो आले तर मी थेट काम करण्याल नकार देते.


हिबा नवाबने २०१३ साली टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाउल टाकले. जीजाजी छत पर कोई है मालिकेत ती दुहेरी भूमिकेत दिसते आहे.

Web Title: '... so it's not easy for me to show bikinis and cleavage'; Revealed by the actress in 'Jijaji Chhat Par Koi Hai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.