या शोमध्ये भारती सिंह पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 16:11 IST2018-03-05T10:41:52+5:302018-03-05T16:11:52+5:30

छोट्या पडद्यावरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही आगामी मालिका म्हणजे देशातील काही भ्रष्ट नेत्यांच्या जीवनावरील उपहात्मक भाष्य ...

In this show Bharti Singh will be seen as a guest artist | या शोमध्ये भारती सिंह पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार

या शोमध्ये भारती सिंह पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार

ट्या पडद्यावरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही आगामी मालिका म्हणजे देशातील काही भ्रष्ट नेत्यांच्या जीवनावरील उपहात्मक भाष्य असून अशा त-हेची ‘स्टार प्लस’वरील ही पहिलीच मालिका आहे.स्टॅण्ड-अप विनोदवीर राजीव निगम चैतूलाल या भ्रष्ट राजकीय नेत्याच्या प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.या मालिकेद्वारे प्रेक्षकांना प्रथमच सद्य राजकीय स्थितीवर उपहासात्मक भाष्य केलेले पाहायला मिळेल.चैतूलाल हा मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेला असून या सत्तालालसेबद्दल त्याला अजिबात अपराधी वाटत नाही.आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,विनोदी अभिनेत्री भारती सिंह ही या मालिकेत एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.एका सूत्राने सांगितले,“या मालिकेत एका पाहुण्या कलाकाराची भूमिका करण्यासाठी भारती सिंहकडे विचारणा करण्यात आली आहे.या मालिकेत ती चैतूलालबरोबर (राजीव निगम) वावरताना दिसेल.ही भूमिका महत्त्वाची असल्याने निर्मात्यांना त्यासाठी भारती सिंहचीच सर्वप्रथम आठवण झाली.कारण भारती सिंहला विनोदाची उत्तम जाण असून ती ही भूमिका लीलया साकारू शकेल,याची निर्मात्यांना खात्री आहे.”‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमातील सहभागामुळे भारती सिंह प्रसिध्दीच्या झोतात आली असून ती आपल्या स्टॅण्ड-अप कार्यक्रमांमध्ये ‘लल्ली’ नावाची व्यक्तिरेखा उभी करते. आतापर्यंत तिने अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये भूमिका साकारल्या असून विनोद अचूकतेने उभा करण्याच्या तिच्या कौशल्याची सर्वत्र प्रशंसा होत असते.आता ती पुन्हा एकदा या मालिकेत भूमिका रंगविणार असल्याने प्रेक्षकांनाही ही भूमिका हसून हसून लोटपोट करणार हे मात्र नक्की.

सिनेमा असो किंवा मालिका,रिल लाईफ असो किंवा रिअल लाईफ कलाकार आपल्या भूमिकेप्रमाणेच लूकवरही खूप मेहनत घेताना दिसतात.काही तरी वेगळं करण्याचा किंवा मग वेगळं दिसण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेताना दिसतात.आता आणखी एका टीव्ही  अभिनेत्रीचा  नवा लूक समोर आला आहे.आता ती अभिनेत्री कोण हे जाणून घेण्यासाठी तुमचीही उत्सुकता वाढली असणारच.तर ती आहे कॉमेडी क्विन भारती सिंह होय,भारतीनेच आपले वजन कमी करत आपला नव्या लूकची सा-यांकडून वाहवा मिळवताना दिसतेय.तिचा हा नवा अवतार पाहून तुम्हालाही वाटेल की खरच भारती खूप मेहनती आहे.भारतीचे वजन जवळपास 85 किलो होते आणि आता तिने तिचे वजन 10 किलोने कमी केले आहे. तिचा हा नवा लूक पाहून तिला खूप सा-या चांगल्या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.तिच्या या नव्या लूकची खूप चर्चा होताना दिसतेय.मात्र तिचा भारीभक्कम शरिरावर तिने कधीच कमी लेखले नाहीय उलट तिच्या या भरभरक्कम शरिराचाच कॉमेडीच्या माध्यमातून चांगला वापर केला आणि बघता बघता भारती कॉमन पर्सन ते सेलिब्रेटी बनली.रसिकांनाही भारतीचा तो अंदाज आवडला.रिअॅलिटी शोमधून सुरूवात करत तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. 

Web Title: In this show Bharti Singh will be seen as a guest artist