रिअॅलिटी शोचा किंग प्रिंस नरूला करणार या शोला जज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 18:38 IST2016-11-18T18:38:42+5:302016-11-18T18:38:42+5:30

अनेक रिअॅलिटी शोचे विजेते पद आपल्या नावावर करणारा  प्रिंस नरूला आता रोडीज राइजिंगच नवीन सिझन जज करणार आहे. 2015मध्ये ...

Shola judges will not rule out the reality show? | रिअॅलिटी शोचा किंग प्रिंस नरूला करणार या शोला जज?

रिअॅलिटी शोचा किंग प्रिंस नरूला करणार या शोला जज?

ेक रिअॅलिटी शोचे विजेते पद आपल्या नावावर करणारा  प्रिंस नरूला आता रोडीज राइजिंगच नवीन सिझन जज करणार आहे. 2015मध्ये  रोडीजचे 12वे सीजन जिंकल्यानंतर रोडीज X2 चा  अल्टीमेट रोडीज टाइटल आपल्या नावावर केला. स्प्लिटसव्हीलाचा 8वे पर्वही जिंकला तसेच  बिग बॉसचेमध्येही त्याने त्याच्या बिनधास्त स्टाइलमुळे  9 वे पर्व गाजवत बिग बॉसचाही विजेताही बनला.त्यामुळे प्रिंसला रिअॅलिटी शोचा किंग म्हणून ओळखले जाते. एकेकाळी स्पर्धकांना टक्कर देणारा प्रिंस नरूला आता थेट इतर स्पर्धकांचे परिक्षण करणार आहे.स्पर्धक ते जज बनण्यापर्यंतचा प्रवासाविषयी प्रिंसने सांगितले की, स्वतःला सिध्द करण्यासाठी कस लागला आता इतर स्पर्धकांचे परिक्षण करताना डबल कस लागणार आहे. जज करणे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरणार असून मला स्वतःला एक चांगला जज सिध्द करायचे आहे त्यामुळे थोडे दडपण आले आहे.प्रिंस सह करण कुंद्रा, क्रिकेटर हरभजन सिंह, अभिनेत्री  नेहा धुपिया आणि रणविजय सिंह हे देखील शोला जज करणार आहेत.सध्या प्रिंस बढो बहू या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रिंसला त्याच्या बोल्ड अंदाजात तेही रोडीजचे जजच्या भूमिकेत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Shola judges will not rule out the reality show?