'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये धक्कादायक वळण, नेत्राच्या आयुष्यात शतग्रीवची एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 15:20 IST2024-08-14T15:19:33+5:302024-08-14T15:20:16+5:30

Satavya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. मालिकेत नेत्राने विरोचकाचा वध करून आपल्या दोन्ही जुळ्या मुलींना सोबत आपल्या आयुष्यात पुढेच आयुष्य जगायची सुरूवात करते.

Shocking twist in 'Satavya Mulichi Satavi Mulgi', Shatagriva's entry in Netra's life? | 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये धक्कादायक वळण, नेत्राच्या आयुष्यात शतग्रीवची एन्ट्री?

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये धक्कादायक वळण, नेत्राच्या आयुष्यात शतग्रीवची एन्ट्री?

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. मालिकेत नेत्राने विरोचकाचा वध करून आपल्या दोन्ही जुळ्या मुलींना सोबत आपल्या आयुष्यात पुढेच आयुष्य जगायची सुरवात करते. पण तिला जाणवू आणि दिसू लागते की  दोन्ही जुळ्या मुलींचे स्वभाव मात्र विरुद्ध आहेत. जिथे ईशा देवाशी निगडित असलेल्या गोष्टींना स्वीकारते पण रीमाला मात्र  देवांच्या संदर्भातील एकही गोष्ट आवडत नाही. अशीच काही  गोष्ट कोलकातामध्ये घडते.

कोलकातामध्ये जिथे एका उत्खननात शतग्रीव नामक असूराचा शिलालेख सापडतो. त्या शिलालेखाचं वाचन करताच एक शक्ती जागी होते आणि ती शक्ती पश्चिम बंगालच्या दिशेने प्रवास करताना दिसते. डॉ. मैथिली सेनगुप्ता म्हणून एका डॉक्टरच्या  कानात ती किडारुपी शक्ती शिरते. मैथिली सेनगुप्ताचं वागणं बदलून जातं आणि एकाक्षणी मैथिलीमधे शिरलेली शक्ती रूप घेते शतग्रिवचं आणि नवा राक्षस जागा होतो.


 

एक साधी सरळ स्वभावाची मैथीली सेनगुप्ता शतग्रीव बनते व तिच्या सासूचा खून करत महाराष्ट्रच्या दिशेने निघते. काय लिहलंय  मैथिली सेनगुप्ता आणि नेत्राच्या नशिबात. नेत्राची मुलगी रीमा नेत्राच्या आयुष्यात काय बदल घडवेल? 'सातव्या मुलीची सातवी मुलगी २.०' दररोज १०:३० वा. फक्त झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

Web Title: Shocking twist in 'Satavya Mulichi Satavi Mulgi', Shatagriva's entry in Netra's life?