Shocking : पार्टीत अर्शी, सपना अन् बेनाफ्शासोबत सलमान खानच्या ‘या’ खास व्यक्तीने केले गैरवर्तन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 17:45 IST2018-01-16T10:26:49+5:302018-01-16T17:45:41+5:30

‘बिग बॉस-११’च्या ग्रॅण्डफिनालेनंतर एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पार्टीत सलमान खानच्या एका खास व्यक्तीने अर्शी, सपना आणि बेनाफ्शासोबत गैरवर्तन केले.

Shocking: Salman Khan's 'special' person has committed abusive behavior with Arshui, Dream and Benafsha in the party! | Shocking : पार्टीत अर्शी, सपना अन् बेनाफ्शासोबत सलमान खानच्या ‘या’ खास व्यक्तीने केले गैरवर्तन!

Shocking : पार्टीत अर्शी, सपना अन् बेनाफ्शासोबत सलमान खानच्या ‘या’ खास व्यक्तीने केले गैरवर्तन!

र्स वाहिनीच्या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस-११’च्या ग्रॅण्ड फिनालेनंतर झालेल्या पार्टीत शोचा होस्ट सलमान खानच्या मेकअप आर्टिस्टने असे काही वर्तन केले ज्यामुळे सलमान खानला शरमेने मान खाली घालावी लागली. स्पॉटबॉय डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथे झालेल्या बिग बॉसच्या शानदार पार्टीत अर्शी, सपना, बंदगी आणि बेनाफ्शा डान्स फ्लोरवर थिरकत होत्या. अशात सलमान खानचा मेकअप आर्टिस्ट नशेत असे काही वर्तन करून गेला, ज्यामुळे काहीकाळ पार्टी थांबवावी लागली. त्याने अर्शी, सपना आणि बेनाफ्शा यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. 

ALSO READ : आता शिल्पा शिंदेचे करिअर घडविण्याचा सलमान खानने उचलला विडा; दबंग खानने भाभीजीला दिली ‘ही’ आॅफर!

सूत्रानुसार, जेव्हा पार्टी रंगत आली होती तेव्हा सलमानचा मेकअप आर्टिस्ट राजू नाग नशेत चांगलाच धूंद झाला होता. त्याला काहीच कळत नव्हते. तो कोणाबरोबरही गैरवर्तन करीत होता. पुढे तर चक्क डान्स फ्लोरवर चढला. त्याठिकाणी असलेल्या अर्शी, सपना आणि बेनाफ्शाबरोबर तो बळजबरीने डान्स करू लागला. त्याचे विक्षिप्त वर्तन बघून तिघीही घाबरल्या. रिपोर्टनुसार, सलमानला त्याच्या मेकअप आर्टिस्ट राजू नागच्या या प्रतापामुळे सर्वांसमोर शरमेने मान खाली घालावी लागली. जेव्हा त्याला राजूचा हा सर्व प्रकार लक्षात आला तेव्हा त्याने लगेचच त्याला मुंबईला पाठवून दिले. 

ALSO READ : Bigg Boss 11 Winner : अंगुरी भाभी ऊर्फ शिल्पा शिंदेला विजेती घोषित करताच असा केला जल्लोष!

सलमानने तातडीने त्याच्या मेकअप आर्टिस्टवर कारवाई केल्याने वातावरण काहीसे शांत झाले. मात्र यासर्व प्रकारामुळे अर्शी खान, सपना चौधरी आणि बेनाफ्शा खूप घाबरली होती. ग्रॅण्ड फिनालेमध्ये शिल्पा शिंदेने बाजी मारल्यानंतर त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी बिग बॉसकडून खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बिग बॉस सीजन ११ चे सर्व स्पर्धक सहभागी झाले होते. सलमानही काहीकाळ पार्टीत उपस्थित होता. 

Web Title: Shocking: Salman Khan's 'special' person has committed abusive behavior with Arshui, Dream and Benafsha in the party!