'द ५०'चा विजेता ठरला शिव ठाकरे? सोशल मीडियावर लीक झाली माहिती; चाहत्यांमध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:26 IST2026-02-20T11:24:53+5:302026-02-20T11:26:28+5:30
'बिग बॉस मराठी' नंतर शिव ठाकरेने जिंकला आणखी एक रिएलिटी शो?

'द ५०'चा विजेता ठरला शिव ठाकरे? सोशल मीडियावर लीक झाली माहिती; चाहत्यांमध्ये जल्लोष
कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर आलेला 'द ५०' शो काही दिवसातच निरोप घेत आहे. या शोमध्ये निक्की तांबोळी, अरबाज पटेल, शिव ठाकरे, जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव हे मराठमोळे चेहरे दिसले होते. तसंच हिंदी इंडस्ट्रीतील इतर कलाकार सहभागी झाले होते. या सर्वांवर मात करत अमरावतीचा वाघ शिव ठाकरे शो जिंकला असल्याची चर्चा रंगली आहे.
'द ५०' मधून रिएलिटी शोचा नवीन फॉर्मॅट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ५० स्पर्धक एकाच छताखाली भव्य मॅन्शनमध्ये राहायला आले आणि त्यांच्याच वेगवेगळे टास्क, खेळ रंगले. हा टास्क वर आधारित शो असला तरी लोकांना बिग बॉससारखीच भांडणं यामध्येही पाहायला मिळाली. सहभागी झालेले अनेक स्पर्धक बिग बॉसचे माजी स्पर्धकही राहिले आहेत. आता शो निरोप घेत असून गुरुवारी याचा ग्रँड फिनाले शूट झाला. अनेक सोशल मिडिया पेजवर शोचा विजेता कोण हे लीक झालं. अमरावतीचा वाघ, बिग बॉस मराठी सीझन २ चा विजेता शिव ठाकरेने 'द ५०'शो जिंकला असल्याचा अनेक सोशल मीडियावर पेजेसने दावा केला आहे.
🚨 BREAKING! Shiv Thakare becomes the WINNER of India's biggest reality show #The50
— BBTak (@BiggBoss_Tak) February 19, 2026
Congratulations!! 🎊
शिव ठाकरे खरोखर विजेता असेल तर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आलं आहे. याआधी शिवने एक रिएलिटी शो जिंकला आहेच. तसंच हिंदी बिग बॉस १६ मध्येही तो रनर अप ठरला होता. आता आणखी एक रिएलिटी शोचं विजेतेपद त्याच्या नावावर झाल्याची चर्चा आहे. काही प्रेक्षकांना रजत दलाल विजेता होईल असा अंदाज होता. शिवचं नाव आल्यावर काहींमध्ये नाराजीही पसरली आहे. प्रिन्स नरुलाने सेमीफायनल टास्कमध्ये टिकिट तू फिनाले जिंकूनही खास मित्र शिव ठाकरेसाठी जागेचा त्याग केला. यामुळे शिव टॉप ४ पर्यंत पोहोचला होता.
'द ५०'चा फिनाले ग्रँड स्वरुपाचा असणार आहे. २२ मार्च रोजी जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हवर फिनाले टेलीकास्ट होणार आहे. शोचा विजेता कोण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.