​बेपनाह या मालिकेत जेनिफर विंगेट आणि हर्षद चोपडा दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 11:53 IST2018-03-15T06:23:57+5:302018-03-15T11:53:57+5:30

बेपनाह या मालिकेत एक वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दोन अनोळखी व्यक्तींची एका रहस्यमय अपघातात ओळख होते आणि ...

In this series, in the absence of Jennifer Wingate and Harshad Chopra, | ​बेपनाह या मालिकेत जेनिफर विंगेट आणि हर्षद चोपडा दिसणार या भूमिकेत

​बेपनाह या मालिकेत जेनिफर विंगेट आणि हर्षद चोपडा दिसणार या भूमिकेत

पनाह या मालिकेत एक वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दोन अनोळखी व्यक्तींची एका रहस्यमय अपघातात ओळख होते आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय होते हे बेपनाह मालिकेत दाखवले जाणार आहे. या मालिकेत जेनिफर विंगेट झोयाच्या भूमिकेत, हर्षद चोपडा आदित्यच्या भूमिकेत आणि सेहबान अझिम, यश (झोयाचा पती) आणि नमिता दुबे पूजाच्या भूमिकेत (आदित्यची पत्नी) दिसणार आहेत. सिनेव्हिस्टाजची निर्मिती असलेली बेपनाह ही मालिका १९ मार्चला सुरू होणार आहे. या मालिकेतील भूमिकेविषयी जेनिफर विंगेट सांगते, “या मालिकेची कथा ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यांत पाणी आले होते. बेपनाह सारखा शो क्वचित करायला मिळतो आणि त्यामुळे या मालिकेत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझे पात्र झोया ही एक अतिशय गोड, नम्र तरुण मुलगी असून ती घरातील लाडकी मुलगी असल्याने ती एका सुरक्षित वातावरणात लहानाची मोठी झाली आहे. एका स्फोटामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलते. मी, हर्षद आणि सेहबान सोबत नुकतेच या ब्लास्टचे शूटिंग केले. हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता.” या मालिकेत आदित्यची भूमिका साकारणारा हर्षद चोपडा सांगतो, “मी अनेक वर्षांनंतर टेलिव्हिजनवर परत येत आहे. मी छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी योग्य कथेची वाट पाहात होतो. ही मालिका कमबॅकसाठी योग्य असल्याचे वाटल्याने मी ही मालिका स्वीकारण्याचे ठरवले. जेनिफर आणि माझी चित्रीकरणादरम्यान खूप चांगली मैत्री झाली आहे. प्रेक्षकांना आमची केमिस्ट्री आवडेल अशी मला खात्री आहे. 
बेपनाह या मालिकेत झोयाच्या पतीची म्हणजेच यशची भूमिका साकारणारा सेहबान अझिम त्याच्या भूमिकेविषयी सांगतो, या मालिकेतील प्रत्येक पात्र, त्याचा लूक, मालिकेचे संवाद या गोष्टींकडे टीमने बारकाईने लक्ष दिले गेले आहे आणि त्यामुळे आम्ही केलेला प्रत्येक सीन उत्कृष्ट होत आहे. नमिता दुबे 
आपल्या भूमिकेविषयी सांगते, टेलिव्हिजन वरील सर्वात चांगली टीम म्हणून आम्ही आज काम करत आहोत, कॅमेऱ्यासमोर आणि त्याच्यामागे सुद्धा आम्ही खूप धमाल मस्ती करतो. आमच्या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याचा मला आनंद होत आहे. 

Also Read : लहानपणी अशी दिसायची अभिनेत्री जेनिफर विंगेट

Web Title: In this series, in the absence of Jennifer Wingate and Harshad Chopra,