'संगीत सम्राट'च्या मंचावर 'सविता दामोदर परांजपे' चित्रपटाच्या कलाकारांनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 05:52 PM2018-09-06T17:52:48+5:302018-09-06T17:53:38+5:30

'संगीत सम्राट'च्या मंचावर 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटाची टीम येण्यासाठी सज्ज झाली आहे.

Savita Damodar Paranjape movie team visit Sangeet Samrat show | 'संगीत सम्राट'च्या मंचावर 'सविता दामोदर परांजपे' चित्रपटाच्या कलाकारांनी लावली हजेरी

'संगीत सम्राट'च्या मंचावर 'सविता दामोदर परांजपे' चित्रपटाच्या कलाकारांनी लावली हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्दे'संगीत सम्राट'मध्ये या आठवड्यातील परफॉर्मन्सेस आशा भोसलेंना समर्पित

 

'संगीत सम्राट' पर्व दुसरेने संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणत आहेत. या आठवड्यात 'संगीत सम्राट'च्या मंचावर खास पाहुणे कलाकार येणार आहेत.'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटाची टीम या मंचावर येण्यासाठी सज्ज झाली आहे.

सुबोध भावे, राकेश बापट, स्वप्नील बांदोडकर, निलेश मोहरीर आणि अमितराज या पाहुण्या कलाकारांनी 'संगीत सम्राट' पर्व २च्या स्पर्धक आणि कॅप्टन्सना प्रोत्साहित करण्यासाठी मंचावर उपस्थिती दर्शवली. प्रख्यात गायिका अाशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त 'संगीत सम्राट'मध्ये या आठवड्यातील परफॉर्मन्सेस हे आशाजींना समर्पित करण्यात आले आहेत. सर्व स्पर्धकांनी आशाजींची सुप्रसिद्ध गाणी सादर केली. आदर्श, स्वप्नील आणि राहुल देशपांडे या तिन्ही सुप्रसिद्ध गायकांना प्रेक्षक पहिल्यांदा एकत्र एका मंचावर पाहू शकणार आहेत. त्यांनी 'ए जिंदगी गले लगाले' हे लोकप्रिय गाणे सादर केले. संगीत सम्राटमधील सुरांची मैफिल पाहून अभिनेता सुबोध भावे देखील स्वतःला गाण्यापासून रोखू शकला नाही. सुबोधने देखील 'रात्रीस खेळ चाले' या गाण्याचे बोल गुणगुणले. ही सुरांची मैफिल पाहण्यासाठी 'संगीत सम्राट'चा आगामी भाग पाहावा लागेल.

Web Title: Savita Damodar Paranjape movie team visit Sangeet Samrat show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.