​या कारणामुळे रिनाने सोडली मालिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 11:25 IST2016-11-07T11:25:18+5:302016-11-07T11:25:18+5:30

शक्ती... अस्तित्व के एहसास या मालिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निम्मीचा मृत्यू झाल्याचे आपल्याला नुकतेच दाखवण्यात आले आहे. निम्मीटा मृत्यू दाखवल्याने ...

Reason for the series left for this reason? | ​या कारणामुळे रिनाने सोडली मालिका?

​या कारणामुळे रिनाने सोडली मालिका?

्ती... अस्तित्व के एहसास या मालिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निम्मीचा मृत्यू झाल्याचे आपल्याला नुकतेच दाखवण्यात आले आहे. निम्मीटा मृत्यू दाखवल्याने या मालिकेच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसलेला आहे. पण या मालिकेत निम्मी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे एक विशेष कारण आहे. या मालिकेत निम्मीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रीना कपूरने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने या व्यक्तिरेखेला निरोप देण्यात आला. रीनाचे पती काही कामांसाठी वर्षभर अमेरिकेला जाणार असल्याने तीदेखील त्यांच्यासोबत अमेरिकेला जाणार आहे. त्यामुळे तिने ही मालिका सोडली. याविषयी रीना सांगते, "या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडत असल्याने ही मालिका मी सोडेन असा विचार कधीच केला नव्हता. पण केवळ एका दिवसांत मी मालिका सोडण्याचे ठरवले. माझ्या नवऱ्याला एका वर्षासाठी अमेरिकेला जायचे आहे. मी त्याच्याशिवाय एकटी भारतात राहाण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे मी त्याच्यासोबत अमेरिकेला जायचे ठरवले. अमेरिकेला जायचे असल्यास मालिका सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी मालिका सोडणार आहे असे माझ्या टीमला सांगितले. त्यांनीदेखील माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला. मी मालिका सोडल्यानंतर माझी जागा दुसरी कोणी अभिनेत्री घेईन असे मला वाटत होते. पण टीममधील मंडळींनी माझी रिप्लेसमेंट न करता माझ्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाल्याचे दाखवले. माझी व्यक्तिरेखा दुसरे कोणीही साकारत नाहीये याचा मला खूपच आनंद होत आहे. त्यामुळे मी साकारत असलेली निम्मी कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहाणार आहे."

Web Title: Reason for the series left for this reason?