​या कारणामुळे ना आना इस देस लाडो 2 या मालिकेला मेघना मलिकने ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:18 IST2018-01-05T11:48:18+5:302018-01-05T17:18:18+5:30

ना आना इस देस लाडो ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेने जवळजवळ तीन-चार वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मेघना ...

For this reason I did not let this Des Lado 2 series be thrown by Meghna Malik | ​या कारणामुळे ना आना इस देस लाडो 2 या मालिकेला मेघना मलिकने ठोकला रामराम

​या कारणामुळे ना आना इस देस लाडो 2 या मालिकेला मेघना मलिकने ठोकला रामराम

आना इस देस लाडो ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेने जवळजवळ तीन-चार वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मेघना मलिक यांची या मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली होती. ना आना इस देस लाडो या मालिकेची लोकप्रियता पाहाता ना आना इस देस लाडो या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ना आना इस देस लाडो या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना मेघना मलिकला मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या सिझनमधील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडत असल्याचे प्रेक्षक आवर्जून सांगतात. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका मेघना सोडणार असल्याची चर्चा आहे. मेघनाने ही मालिका सोडण्याचे एक खास कारण आहे. ना आना इस देस लाडो या मालिकेत अविका गौर एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. अविकालाच्या व्यक्तिरेखेला या मालिकेत अधिक महत्त्व दिले जात असल्याने मेघनाने या मालिकेला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे. मेघनाने ना आना इस देस लाडो ही मालिका स्वीकारली त्यावेळी तिला ही गोष्ट सांगण्यातच आली नव्हती. तिला ज्यावेळी पटकथा ऐकवण्यात आली, त्या पटकथेत तिचीच व्यक्तिरेखा महत्त्वाची असल्याचे तिला सांगण्यात आले होते. 
ना आना इस देस लाडो या मालिकेत अम्माजीच्या व्यक्तिरेखेत आपल्याला मेघनाला पाहायला मिळते. आता अम्माजीचे निधन झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण विशेष म्हणजे मेघना या दृश्याचे चित्रीकरण करायला देखील तयार नाहीये. त्यामुळे मालिकेची टीम तिने चित्रीकरण करावे यासाठी प्रयत्न करत आहे. आता ती या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करते का तसेच या मालिकेत यापुढे अम्माजी ही व्यक्तिरेखा दाखवलीच जाणार नाही की अम्माजी ही व्यक्तिरेखा दुसरे कोणी साकारणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.

Also Read : अविकाने म्हटले, लोक म्हणायचे ‘१९ वर्षांनी मोठ्या असलेल्या या अभिनेत्यापासून मला दोन मुले आहेत’!

Web Title: For this reason I did not let this Des Lado 2 series be thrown by Meghna Malik