रसिका सुनीलने प्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, फोटोवर झाले चाहते फिदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 12:26 IST2021-03-18T12:19:39+5:302021-03-18T12:26:38+5:30

रसिका सुनीलने शेअर केलेल्या या फोटोत तिची परफेक्ट फिगर आपल्याला पाहायला मिळत आहे.

Rasika Sunil planted a perfect figure, picture viral on social media | रसिका सुनीलने प्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, फोटोवर झाले चाहते फिदा

रसिका सुनीलने प्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, फोटोवर झाले चाहते फिदा

ठळक मुद्देरसिकाच्या फिगरचे तिचे चाहते चांगलेच कौतुक करत आहेत. तिच्या या फोटोला काहीच तासांत 68 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारत होती. शनायाच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपल्या चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देत असते. तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

रसिका सुनीलने शेअर केलेल्या या फोटोत तिची परफेक्ट फिगर आपल्याला पाहायला मिळत आहे. रसिकाच्या फिगरचे तिचे चाहते चांगलेच कौतुक करत आहेत. तिच्या या फोटोला काहीच तासांत 68 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 

रसिकाने असे फोटोशूट पहिल्यांदाच केले आहे असे नाही यापूर्वीही तिच्या ब्युटी, बोल्डनेस इन ब्लॅक अंदाज कॅमे-यात कैद झाले आहेत. तिच्या या फोटोंनाही रसिकांची तितकीच पसंती मिळत आहे. तुर्तास रसिकाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय. रसिका नेहमीच आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

रसिका सुनील गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा फोटो आणि व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर करत म्हटले होते की, अनपेक्षितपणे जानेवारी २०२० मध्ये प्रेमात पडले. लाँग डिस्टन्स नाते आहे. अखेर वर्षानंतर आदित्य बिलागीला पाहू शकले. मला माहीत आहे मी इथे आल्यापासून आम्ही भावनांच्या रोलर कोस्टरमधून गेलो आहोत. मग आजी आम्हाला सोडून गेली. त्यानंतर आम्ही दोघे आजारी पडलो. प्रत्येक क्षण मी तुझ्यासोबत होते तर सर्व क्षण तुझ्यापासून लांब आहे. तू नकळत मला दररोज तुझ्याबद्दल आदर आणि प्रेम करण्याची लाखो कारणे दिली आहेस. आपल्या या मोहक प्रवासाला एक वर्षेदेखील झाले. 

Web Title: Rasika Sunil planted a perfect figure, picture viral on social media