राज ठाकरे की अजित पवार? आदेश बांदेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 13:28 IST2024-04-11T13:27:56+5:302024-04-11T13:28:27+5:30

"राज ठाकरे की अजित पवार? कोणाला पाठिंबा" असा प्रश्न आदेश बांदेकर यांना मुलाखतीत विचारण्यात आला. क्षणभरही विचार न करता आदेश बांदेकर यांनी थेट या प्रश्नाचं उत्तर दिलं.

raj thackeray or ajit pawar marathi actor aadesh bandekar support whom watch | राज ठाकरे की अजित पवार? आदेश बांदेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

राज ठाकरे की अजित पवार? आदेश बांदेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर. मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेल्या आदेश बांदेकरांनी कठीण परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं नाव कमावलं. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. अभिनयाबरोबरच ते राजकारणातही सक्रिय आहेत. आदेश बांदेकरांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 

लोकमत फिल्मीच्या 'नो फिल्टर' शोमध्ये आदेश बांदेकरांनी हजेरी लावली होती. यामध्ये वैयक्तिक आयुष्याबरोबरच राजकारणाबद्दलही त्यांनी भाष्य केलं. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांबद्दलही आदेश बांदेकर आपुलकीने बोलताना दिसले. या मुलाखतीत त्यांना रॅपिड फायरमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला. "राज ठाकरे की अजित पवार? कोणाला पाठिंबा" असा प्रश्न आदेश बांदेकर यांना मुलाखतीत विचारण्यात आला. क्षणभरही विचार न करता आदेश बांदेकर यांनी थेट या प्रश्नाचं उत्तर दिलं. "उद्धवसाहेब ठाकरे", असं बांदेकर म्हणाले. 

आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकरही उत्तम अभिनेत्री आहेत. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तर आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बांदेकरांचा लेक सोहमही याच क्षेत्रात कार्यरत आहे. आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन या निर्मिती संस्थेचं काम सोहम पाहतो. या प्रोडक्शनच्या माधम्यातून 'घरोघरी मातीच्या चुली', 'सुख कळले' या मालिकांची सध्या निर्मिती होत आहे. 
 

Web Title: raj thackeray or ajit pawar marathi actor aadesh bandekar support whom watch