छोट्या पडद्यावरील हा प्रसिद्ध सूत्रसंचालक बनणार बाबा, त्याच्या पत्नीने सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:55 PM2019-08-05T15:55:32+5:302019-08-05T15:56:57+5:30

या कपलचे काहीच महिन्यांपूर्वी लग्न झाले असून आता त्यांच्या आयुष्यात एका गोंडस बाळाचे आगमन होणार आहे.

Raghu Ram And Natalie Di Luccio Are Having A Baby | छोट्या पडद्यावरील हा प्रसिद्ध सूत्रसंचालक बनणार बाबा, त्याच्या पत्नीने सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

छोट्या पडद्यावरील हा प्रसिद्ध सूत्रसंचालक बनणार बाबा, त्याच्या पत्नीने सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

googlenewsNext
ठळक मुद्देरघुरामची पत्नी नताली डी लुसियोने सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना हे सांगितले आहे. तिने रघु रामसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, आम्ही आमच्या आयुष्यात सगळ्या मोठ्या अ‍ॅडव्हेंचर्ससाठी तयार होत आहोत.

एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमाला गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या कार्यक्रमामुळे रघु रामला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. एमटिव्ही लव्ह लाईन या कार्यक्रमाद्वारे त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर २००४ मध्ये इंडियन आयडल या कार्यक्रमात तो एक स्पर्धक म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. पण त्याची त्यावेळी इंडियन आयडलमध्ये निवड झाली नव्हती. पण एमटिव्ही रोडीजमुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 

रघु रामचे काहीच महिन्यांपूर्वी लग्न झाले. आता त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात एका गोंडस बाळाचे आगमन होणार आहे. रघु रामच्या पत्नीनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. रघुरामची पत्नी नताली डी लुसियोने सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना हे सांगितले आहे. तिने रघु रामसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, आम्ही आमच्या आयुष्यात सगळ्या मोठ्या अ‍ॅडव्हेंचर्ससाठी तयार होत आहोत. या फोटोत नतालीच्या हातात लहान मुलांचे शूज दिसत आहेत.

नतालीसोबतच रघु रामने देखील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर अ‍ॅडव्हेंचर्ससाठी तयार असल्याचे लिहिले आहे. त्यांच्या दोघांची ही पोस्ट पाहून त्यांचे फॅन्स त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत. नतालीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिची डिलिव्हरी कोणत्या महिन्यात होणार याविषयी देखील सांगितले आहे. आम्ही जानेवारीला एका गोंडस बाळाचे पालक होणार असल्याचे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. 

रघु राम आणि नताली यांनी गेल्या डिसेंबरमध्ये दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले होते. या लग्नाला केवळ त्यांच्या घरातील जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते. रघु रामचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न सुगंधा गर्गसोबत झाले होते. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले. सुगंधा ही अभिनेत्री, गायिका असून तिने काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. सुगंधासोबत घटस्फोट झाल्यानंतर काहीच महिन्यात रघुराम आणि नताली यांनी लग्न केले होते. नतालीदेखील प्रसिद्ध गायिका आहे. 

Web Title: Raghu Ram And Natalie Di Luccio Are Having A Baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.