महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार 'क्वीन्स है हम'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 15:29 IST2016-11-23T15:28:41+5:302016-11-23T15:29:51+5:30

'क्वीन्स है हम' या मालिकेत  भावना पानी माया भियानी  ही मुख्य भूमिका साकारतेय.याविषयी भावनाने सांगितले की,मालिकेमध्ये एक समान धागा ...

Queens 'Hum' to be inspirational for women? | महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार 'क्वीन्स है हम'?

महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार 'क्वीन्स है हम'?

'
;क्वीन्स है हम' या मालिकेत  भावना पानी माया भियानी  ही मुख्य भूमिका साकारतेय.याविषयी भावनाने सांगितले की,मालिकेमध्ये एक समान धागा पाहायला मिळणार आहे ते म्हणजे महिला आणि त्यांचे जीवनजगण्याची पध्दतींवर मालिकेत भाष्य करण्यात आले आहे.मी एम्पोर्ट -एक्सपोर्ट व्यवसायामध्ये काम करणारा एका श्रीमंत उद्योगपतीसोबत माझे लग्न झाल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे.माझे एक छानसे कुटूंब आहे, गोंडस मुलगा आणि मुलीची आई मी आहे. याशिवाय तिला स्वतःला फॅशन आणि मेकअपची खूप आवड असल्याने तिचे एक छानसे ब्युटीसलून आहे. वेलसेटल अशी ती महिला आहे. मात्र तरीही तिच्या आयुष्यात  काही ट्वीस्ट आहे. विशेष म्हणजे तिच्या  वैवाहिक जीवनाविषयी ती आनंदीत नाही, तिला वाटते की तिच्या मूर्ख पतीसोबत ती संपूर्ण आयुष्य वाया घालवते.अशा प्रकारे ही भूमिका रंगवण्यात आल्याचे भावनाने सांगितले.'क्वीन्स है हम'  मालिकेत दिल्लीमध्ये राहणा-या पाच महिलांची कथा आहे. या महिलांना त्यांचे जीवन स्वतःच्या मर्जीनुसार जगायला आवडते.त्यांची स्वतःची काही आवडीनिवडी आहेत. महिलांनी आजही बंधनात राहावे ही विचारसरणी त्यांना पटत नसली तरीही परिवाराच्या नैतिकतेमध्येच राहावे असे त्यांना सांगितले जाते.त्यांच्यापैकी बहुतेकांनी त्यांच्या जीवनाशी तडजोडही केली आहे. सगळ्या सुखसोईच्या गोष्टी असूनही त्यांना दुस-यांच्या नियमानुसार त्यांचे जीवन जगावे लागते.त्यामुळे ही मालिका पाहिल्यानंतर कुठेतरी प्रत्येक महिलावर्गाला स्वतःच्या मर्जीनुसार त्यांचे आयुष्य जगायला प्रेरित करेन.अशा प्रकारची अनोख्या संपकल्पनेवर आधारित ही मालिका आहे.

Web Title: Queens 'Hum' to be inspirational for women?