धक्कादायक! लग्नाला नकार दिल्याने २९ वर्षांच्या प्रसिद्ध सिंगरची हत्या, बंदुक दाखवत किडनॅप केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:11 IST2026-05-19T16:10:41+5:302026-05-19T16:11:37+5:30

लग्नाला नकार दिल्याने इंदरची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून इंदर कौरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

punjabi singer inder kaur murdered due to refused marriage proposal | धक्कादायक! लग्नाला नकार दिल्याने २९ वर्षांच्या प्रसिद्ध सिंगरची हत्या, बंदुक दाखवत किडनॅप केलं अन्...

धक्कादायक! लग्नाला नकार दिल्याने २९ वर्षांच्या प्रसिद्ध सिंगरची हत्या, बंदुक दाखवत किडनॅप केलं अन्...

सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध पंजाबी सिंगर इंदर कौर हिची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी(१९ मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इंदर कौरचा मृतदेह नीलो नहर येथे आढळला. ती २९ वर्षांची होती. ६ दिवसांपूर्वी इंदर कौरला किडनॅप करण्यात आलं होतं. लग्नाला नकार दिल्याने इंदरची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून इंदर कौरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सुखविंदर सिंह उर्फ सुक्खा इंदर कौरसोबत लग्न करू इच्छित होता. मात्र इंदरने त्याला लग्नासाठी नकार दिला होता. त्याच रागातून सुखविंदरने इंदरला किडनॅप केलं आणि तिची हत्या केली. इंदर कौरचा भाऊ जोतइंदर सिंहने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार इंदर कौर १३ मे रोजी संध्याकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मार्केटमध्ये गेली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा संशय बळावला. 


सुखविंदर सिंह हा कॅनडाहून पंजाबमध्ये आला होता. इंदरने लग्नास नकार दिल्याने त्याने संधी पाहून तिला बंदुकीचा धाक दाखवून किडनॅप केलं. त्यानंतर तिची हत्या करत तिचा मृतदेह नीलो नहरमध्ये फेकून दिला. इंदर कौरची हत्या केल्यानंतर सुखविंदर सिंह हा कॅनडाला फरार झाला आहे. सुखविंदर आणि त्याच्या साथीदारांविरोधात इंदर कौरच्या कुटुंबीयांनी पोलिसांत १५ मे रोजीच एफआयआर दाखल केली होती. मात्र पोलिसांनी त्यानंतर कोणतीच कारवाई केली नाही, असा आरोप इंदर कौरच्या कुटुंबीयांचा आहे. 

Web Title : शादी से इनकार करने पर गायिका की हत्या; बंदूक दिखाकर किया अपहरण

Web Summary : पंजाबी गायिका इंदर कौर की शादी से इनकार करने पर सुखविंदर सिंह ने हत्या कर दी। सुखविंदर ने बंदूक दिखाकर उसका अपहरण किया और नहर में शव फेंक दिया। वह कनाडा भाग गया है; पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Singer Murdered After Refusing Marriage Proposal; Kidnapped at Gunpoint

Web Summary : Punjabi singer Inder Kaur was murdered after refusing to marry Sukhwinder Singh. Sukhwinder kidnapped her at gunpoint and dumped her body in a canal. He has since fled to Canada; police are investigating the case.