कुलस्वामिनी मालिकेतील प्रशांत चौडप्पा मित्रांना भेटला तब्बल 23 वर्षांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 14:53 IST2017-07-14T09:23:03+5:302017-07-14T14:53:03+5:30

शाळा, कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना अनेक वर्षांनी भेटणे हा धमाल अनुभव असतो. शाळेत, कॉलेजमध्ये केलेली मजामस्ती आठवून खूप हसू येतं. आपल्या ...

Prashant Chaudappa of Kalswamy series met friends 23 years later | कुलस्वामिनी मालिकेतील प्रशांत चौडप्पा मित्रांना भेटला तब्बल 23 वर्षांनी

कुलस्वामिनी मालिकेतील प्रशांत चौडप्पा मित्रांना भेटला तब्बल 23 वर्षांनी

ळा, कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना अनेक वर्षांनी भेटणे हा धमाल अनुभव असतो. शाळेत, कॉलेजमध्ये केलेली मजामस्ती आठवून खूप हसू येतं. आपल्या शाळेच्या मित्रांना अनेक वर्षांनी भेटून कुलस्वामिनी मालिकेतील अभिनेता प्रशांत चौडप्पा सध्या प्रचंड खूश झाला आहे. त्याने तब्बल 23 वर्षांनी 'बॅक टू स्कूल'चा अनुभव घेतला. इतकेच नाही तर जुन्या मित्रमंडळींसोबत धमाल गाणी म्हटली, नाच केला, अगदी चेष्टामस्करी देखील केली. प्रशांत सध्या 'कुलस्वामिनी' या मालिकेत अवधूत देवधर ही भूमिका साकारत आहे.
आपण आपल्या दैनंदिन शेड्यूलमध्ये कायमच व्यग्र असतो. त्यामुळे आपल्याला मित्रमैत्रिणींना, नातलगांना वेळच द्यायला मिळत नाही. डेली सोप मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकाराचे तर अनेक तास चित्रीकरणांमध्येच जातात. पण नुकताच प्रशांतने आपल्या मित्रमैत्रिणींसाठी खास वेळ काढला होता. प्रशांत हा आज कामाच्या निमित्ताने मुंबईत राहात असला तरी तो मुळचा सोलापुरचा आहे. त्याचे शिक्षण मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले आहे. प्रशांत आणि त्याचे शाळेतील मित्रमंडळी नुकतेच एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. या ग्रुपवर रियुनियन करण्याची चर्चा झाली आणि त्यांच्या शाळेतच सोलापूरला त्यांनी रियुनियन केले. शाळेतल्या मित्रांपैकी कुणी इंजिनिअर बनले आहे तर कुणी तर कुणी प्राध्यापक. पण तरीही सगळे आपल्या व्यग्र कामकाजातून वेळ काढून रियुनियनसाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. तसेच या रियुनियला त्यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांना देखील बोलावले होते. त्यांनी त्यांच्या शिक्षकांचा सत्कारदेखील केला. 
एवढ्या वर्षांनी आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटल्याचा सर्वांनाच आनंद झाला होता. एकमेकांची चौकशी केल्यानंतर पूर्वीसारखीच चेष्टामस्करी सुरू झाली, गाणी म्हटली गेली आणि नाचही झाला. या रियुनियनने प्रशांतला बॅक टू स्कूलचा आनंद मिळवून दिला.


Also read : 'कुलस्वामिनी' मालिकेतील संग्राम साळवीचा हा संवाद होतोय लोकप्रिय

Web Title: Prashant Chaudappa of Kalswamy series met friends 23 years later