‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 21:00 IST2018-09-29T13:36:37+5:302018-09-29T21:00:00+5:30

पिस्तुल्या, फँड्री आणि सैराट यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहे आणि मुख्य म्हणजे यात तो अभिनय सुद्धा करणार आहे.

Nagraj Manjule will make promo of Zee maharashtra kushti league | ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे दिसणार या भूमिकेत

‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे दिसणार या भूमिकेत

कुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला रांगडा खेळ. झी टॉकीजच्या विद्यमाने महाराष्ट्रातील मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खास ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'चे आयोजन करण्यात आले आहे. या लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालवधीत पुण्याच्या बालेवाडीत रंगणार आहे. ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'च्या निमित्ताने महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीगिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगिरांशी लढताना बघण्याची पर्वणी झी टॉकीजच्या प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे. या बहुचर्चित ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ बरोबर सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज नावे जोडली जात आहेत. त्यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे.

नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून तो केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेताही आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे  महाराष्ट्रातल्या खेळाबाबतही तितकाच  सजग आहे. पिस्तुल्या, फँड्री आणि सैराट यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहे आणि मुख्य म्हणजे यात तो अभिनय सुद्धा करणार आहे. सैराटच्या अफाट यशानंतर प्रेक्षकांच्या नागराज मंजुळेच्या कामाबद्दलच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत आणि नागराज यांचे नवीन काम पाहण्याची सर्वांनाच इच्छा आहे. प्रेक्षकांची ही इच्छा ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’मुळे पूर्ण होणार आहे.

उत्कंठा हा कुस्ती या खेळाचा श्वास आहे. पैलवानांनी शड्डू ठोकल्यापासून चितपट करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाढणारी ही उत्कंठा ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’मुळे आता साऱ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे. नागराज मंजुळे ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’चा हा थरार प्रोमोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहे. या प्रोमोबद्दल नागराज मंजुळे सांगतो,"घरात बसून छोट्या पडद्यावर क्षणक्षणाला उत्कंठा वाढवणारा कुस्ती हा खेळ पाहण्याची मजा काही औरच असेल. ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’शी संलग्न होऊन त्याचा प्रोमो दिग्दर्शित करताना मला खरंच खूप आनंद होत आहे. माझ्या कामावर आजवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले आहे आणि त्यांना हा प्रोमोसुद्धा आवडेल अशी आशा व्यक्त करतो."


 

Web Title: Nagraj Manjule will make promo of Zee maharashtra kushti league