'माझ्या सुनेला त्रास देऊ नको नाहीतर...' मृणाल कुलकर्णींनी कविता लाडला दिली ताकीद; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 09:35 AM2023-06-13T09:35:26+5:302023-06-13T09:37:08+5:30

मृणाल कुलकर्णींची पोस्ट व्हायरल

mrinal kulkarni posts photo with kavita lad with hillarious caption goes viral | 'माझ्या सुनेला त्रास देऊ नको नाहीतर...' मृणाल कुलकर्णींनी कविता लाडला दिली ताकीद; नेमकं प्रकरण काय?

'माझ्या सुनेला त्रास देऊ नको नाहीतर...' मृणाल कुलकर्णींनी कविता लाडला दिली ताकीद; नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) सध्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत दिसत आहे. यामध्ये तिच्या सासूची भूमिका कविता मेढेकर (Kavita Medhekar)  यांनी केली आहे. शिवानीने याआधीही मालिकांमध्ये काम केलं आहे. तर आता लग्नानंतर तिला हा मोठा ब्रेक मिळालाय. मालिकेत भुवनेश्वरी म्हणजेच कविता मेढेकर यांची कडक सासूबाईची भूमिका आहे. तर खऱ्या आयुष्यात शिवानीची सासू मृणाल कुलकर्णीचा (Mrinal Kulkarni) मात्र सूनेसोबत खूप चांगला बॉंड आहे. मृणाल कुलकर्णी यांनी गंमतीत एका पोस्टमधून कविता मेढेकर यांना सक्त ताकीदच दिली आहे.

मृणाल कुलकर्णी यांनी नुकताच कविता मेढेकर यांच्यासोबत एक गोड फोटो पोस्ट केला. या फोटोत दोन्ही अभिनेत्री अगदी चिरतरुण दिसत आहेत. दोघीही मराठी मनोरंजनसृष्टीत बऱ्याच काळापासून सक्रिय आहेत. मृणाल कुलकर्णी यांनी पोस्ट केलेल्या या फोटोचे कॅप्शन मात्र गंमतीशीर आहे. 'आमच्या सुनेला जास्त त्रास देऊ नको बरं का!! नाहीतर तुला शिकवीन चांगलाच धडा!?

मृणालच्या या पोस्टवर सर्वच हसत आहेत.'सॉलिड कॅप्शन आहे','मस्त फोटो' अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या आहेत. सध्या मृणाल कुलकर्णी सिनेमांमध्ये जास्त दिसत आहेत तर त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी दिग्दर्शनात आपलं नशीब आजमावत आहे. सून शिवानी रांगोळे पुन्हा मालिकेत परतली आहे.

Web Title: mrinal kulkarni posts photo with kavita lad with hillarious caption goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.