​मोहित मौनीचा दिवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 14:58 IST2016-06-17T09:28:37+5:302016-06-17T14:58:37+5:30

चक्रवती अशोका सम्राट फेम मोहित रैना आणि नागिन स्टार मौनी राय यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कधीच कबूली दिलेली नाही. मात्र ...

Mohit Maunicha Diwana | ​मोहित मौनीचा दिवाना

​मोहित मौनीचा दिवाना

्रवती अशोका सम्राट फेम मोहित रैना आणि नागिन स्टार मौनी राय यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कधीच कबूली दिलेली नाही. मात्र सध्या मोहितनं मौनीची तोंडभरुन स्तुती केलीय. तसं पाहिलं तर गेल्या काही दिवसांत दोघंही सोशल मीडियावर एकमेंकांच्या कार्यक्रमाचं कौतुक करतायत.. नुकतंच मौनीनं चक्रवर्ती अशोका सम्राट या मालिकेतील मोहितचे विविध लूकमधील फोटो ट्विटरवर शेअर करुन लव्ह स्माईली पोस्ट केले होते. तर लगेचच मोहितनंही मौनीच्या कौतुकाला उत्तर म्हणून तिच्या डान्स रियालिटी शोच्या होस्ट करण्याच्या अंदाजाला सलाम केला.तसंच सो यू थिंक यू कॅन डान्स अशी पोस्टही त्यानं टाकली इतकंच नाही तर एका मुलाखतीमध्ये मोहितनं मौनीच्या नागिनमधील भूमिकेचंही कौतुक केलं. नागिन मालिकेचा टीआरपी जबरदस्त असल्याचं त्यानं म्हटलं.. तसंच मौनीच्या भूमिकेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे असंही त्यानं म्हटलं.मौनीचं मन जिंकण्याची मोहितची ही अदा भारीच म्हणावी लागेल.  

Web Title: Mohit Maunicha Diwana