'मिले जब हम तुम' फेम सम्राट-गुंजनची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा दिसणार; 'या' प्रोजेक्टमध्ये लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:29 IST2026-05-11T13:28:41+5:302026-05-11T13:29:30+5:30

सनाया आणि मोहित नव्या प्रोजेक्टसाठी आले एकत्र

miley jab hum tum fame real life couple mohit sehgal and sanaya irani to work together after many years | 'मिले जब हम तुम' फेम सम्राट-गुंजनची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा दिसणार; 'या' प्रोजेक्टमध्ये लागली वर्णी

'मिले जब हम तुम' फेम सम्राट-गुंजनची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा दिसणार; 'या' प्रोजेक्टमध्ये लागली वर्णी

'मिले जब हम तुम' ही तरुणाईची लोकप्रिय मालिका एकेकाळी खूप गाजली होती. त्यातील मयंक-नुपूर आणि सम्राट-गुंजन या दोन जोड्या हिट झाल्या होत्या. त्यातील सम्राटची भूमिका मोहित सेहगलने साकारली होती. तर गुंजनच्या भूमिकेत सनाया ईरानी होती. सनाया आणि मोहितने २०१६ साली खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाले आहेत. दरम्यान ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. यामुळे त्यांचे चाहते खूश झाले आहेत.

मोहित आणि सनाया आता 'कुबूल है' या प्रोजेक्टसाठी एकत्र आले असून यामुळे सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, सनाया आणि मोहितचा हा नवीन शो कोणत्याही टीव्ही चॅनेलवर नाही तर 'कुकु टीव्ही' या ॲपवर प्रदर्शित होणार आहे. या प्रोजेक्टचे स्वरूप 'व्हर्टिकल माइक्रोड्रामा' असून ही एक वेगळ्या धाटणीची कथा असणार आहे. या नवीन फॉरमॅटमुळे आणि मालिकेच्या प्रभावी कथेमुळेच या दोघांनी या प्रोजेक्टला होकार दिल्याचे बोलले जात आहे.

मोहितसोबत पुन्हा काम करण्याबद्दल सनायाने उत्साहाने सांगितले की, "आम्ही गेल्या १७ वर्षांपासून सोबत आहोत, त्यामुळे आता मोहितसोबत काम करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. आमच्यात आता एक वेगळीच समज निर्माण झाली असून मी त्याच्यासोबत कामाच्या ठिकाणी खूप कंफर्टेबल असते." मोहितने देखील या नवीन आव्हानाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, व्हर्टिकल ड्रामा हा त्यांच्यासाठी एक नवा अनुभव असून तो खूप रोमांचक आहे."

सनाया आणि मोहितने २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती. 'मिले जब हम तुम' नंतर ही जोडी 'नच बलिये' या डान्स रियालिटी शोमध्ये एकत्र दिसली होती. आता तब्बल ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'कुबूल है'च्या निमित्ताने ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'व्हर्टिकल फॉरमॅट'मधील हा त्यांचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे चाहत्यांमध्ये या प्रोजेक्टबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title : 'मिले जब हम तुम' के सितारे लंबे अंतराल के बाद फिर साथ!

Web Summary : 'मिले जब हम तुम' से प्रसिद्ध सनाया ईरानी और मोहित सहगल 'कुबूल है' के लिए कुक्कू टीवी ऐप पर फिर से मिल रहे हैं। 9 साल बाद, यह प्यारी जोड़ी एक वर्टिकल माइक्रोड्रामा में दिखेगी, जो उनके लिए 17 साल के साथ के बाद एक रोमांचक फॉर्मेट है।

Web Title : 'Mile Jab Hum Tum' stars reunite after long gap!

Web Summary : Sanaya Irani and Mohit Sehgal, famed from 'Mile Jab Hum Tum,' are reuniting for 'Qubool Hai' on the Kukku TV app. After 9 years, the beloved on-screen couple will appear in a vertical microdrama, a format they find exciting after 17 years of togetherness.