पेशवा बाजीरावमध्ये मेघा चक्रवर्ती साकारणार मस्तानीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 15:54 IST2017-07-04T10:24:50+5:302017-07-04T15:54:50+5:30

पेशवा बाजीराव यांच्या आयुष्यावरील बाजीराव मस्तानी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि रणवीर ...

Mastani plays the role of Megha Chakraborty in Peshwa Bajirao | पेशवा बाजीरावमध्ये मेघा चक्रवर्ती साकारणार मस्तानीची भूमिका

पेशवा बाजीरावमध्ये मेघा चक्रवर्ती साकारणार मस्तानीची भूमिका

शवा बाजीराव यांच्या आयुष्यावरील बाजीराव मस्तानी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील दीपिकाने साकरलेली मस्तानी तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.
बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या यशानंतर पेशवा बाजीराव ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता मस्तानीचा प्रवेश होणार आहे. या मालिकेत मेघा चक्रवर्ती मस्तानीची भूमिका साकारणार आहे. मेघाने आतापर्यंत काही बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच बडी देवरानी, ख्वाबों की जमीन पर यांसारख्या मालिकांमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. मेघाने आतापर्यंत अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 
मेघाने मस्तानीच्या भूमिकेसाठी काही दिवसांपूर्वी ऑडिशन दिले होते. अनेक नायिकांचे ऑडिशन घेतल्यानंतर या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. या आठवड्यात ती चित्रीकरण करण्यास सुरुवात करणार आहे. मस्तानीची भूमिका साकारणे अतिशय आव्हानात्मक असल्याने ती सध्या यावर प्रचंड मेहनत घेत आहे.
पेशवा बाजीराव ही मालिका तिने सुरुवातीपासून पाहिली आहे. ही मालिका लीप घेत असल्याचे तिला कळल्यावर तिने मस्तानी या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायचे ठरवले. ही भूमिका मीच साकारेन असा तिला विश्वास होता. यासाठी ती अनेक दिवासांपासून बाजीराव-मस्तानीच्या आयुष्यावरील अनेक पुस्तके वाचत होती. ही भूमिका साकारण्यासाठी ती खूप उत्सुक आहे. ती सांगते, पेशवा बाजीराव ही मालिका मी सुरुवातीपासून मी पाहात आहे. या मालिकेत ऐतिहासिक नाट्याचे चित्रण खूपच वास्तविक वाटणारे आहे. मस्तानीचे जीवन जगण्याची मी आतुरतेने वाट पाहात आहे. 

Also Read : समीर धर्माधिकारी झळकणार पेशवा बाजीराव मालिकेत

Web Title: Mastani plays the role of Megha Chakraborty in Peshwa Bajirao