Bigg Boss Marathi 3, Episodes, 26 Dec: आज रंगणार ग्रँड फिनाले; 'बिग बॉस मराठी'ला लवकरच मिळणार तिसऱ्या पर्वाचा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 16:05 IST2021-12-26T16:04:33+5:302021-12-26T16:05:15+5:30

Bigg Boss Marathi 3: १९ सप्टेंबर रोजी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली होती. या तिसऱ्या पर्वामध्ये बिग बॉसच्या घरात तब्बल १५ स्पर्धकांनी एन्टी घेतली होती.

marathi tv show bigg boss marathi 3 Episodes 26 Dec today grand finale | Bigg Boss Marathi 3, Episodes, 26 Dec: आज रंगणार ग्रँड फिनाले; 'बिग बॉस मराठी'ला लवकरच मिळणार तिसऱ्या पर्वाचा विजेता

Bigg Boss Marathi 3, Episodes, 26 Dec: आज रंगणार ग्रँड फिनाले; 'बिग बॉस मराठी'ला लवकरच मिळणार तिसऱ्या पर्वाचा विजेता


 छोट्या पडद्यावरील बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi) तिसऱ्या पर्वाचा अखेर आज ग्रँड फिनाले  (grand finale)म्हणजेच महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस अखेर आज उजाडला आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांनी बिग बॉस मराठीला त्यांच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता मिळणार आहे.

१९ सप्टेंबर रोजी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली होती. या तिसऱ्या पर्वामध्ये बिग बॉसच्या घरात तब्बल १५ स्पर्धकांनी एन्टी घेतली होती. मात्र, जसजसा हा खेळ पुढे रंगत गेला. तसतसं या घरातून एक-एक स्पर्धक बाहेर पडला आणि शेवटच्या टप्प्यात केवळ ५ स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले. यात विशाल निकम हा फायनलमध्ये पोहोचणारा पहिला फायनलिस्ट ठरला. तर, शेवटच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये मीरा जगन्नाथला या घरातून बाहेर पडावं लागलं. 

दरम्यान, आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस मराठी ३ चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात जुन्या-नव्या स्पर्धकांसह अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. त्यानंतर यंदाच्या पर्वातील विजेता प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे बिग बॉस मराठी ३ ची ट्रॉफी यंदा कोणता स्पर्धक घेऊन जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

Web Title: marathi tv show bigg boss marathi 3 Episodes 26 Dec today grand finale