माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालीय...! मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर झाली आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 14:28 IST2021-08-05T14:24:51+5:302021-08-05T14:28:22+5:30

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने आज आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली.

marathi actress urmila nimbalakar blessed with baby boy | माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालीय...! मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर झाली आई

माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालीय...! मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर झाली आई

ठळक मुद्देआपल्या बेबी बंपच्या फोटोंवरून सोशल मीडियावर उर्मिला ट्रोल झाली होती. त्यावर तिने सडेतोड उत्तरदेखील दिले होते.

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने ( Urmila Nimbalakar) आज आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली. होय, उर्मिला आई झालीये. 3 ऑगस्टला तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालीये, असे लिहित  स्वत: उर्मिलाने ही गुड न्यूज चाहत्यांना दिली. 
वडिलांवर, भावावर, सासऱ्यांवर आणि सगळ्यात जास्त चुकलं म्हणजे नव-यावर अती प्रेम असलं की, रंगभूमीपेक्षा जास्त नाट्यनिर्मिती ख-या आयुष्यात होऊन हिरोची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात 3 ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीये, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. (Urmila Nimbalakar blessed with baby boy)

उर्मिलाच्या या पोस्टनंतर तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. स्वप्निल जोशी, जुई गडकरी अशा अनेक कलाकारांनीही उर्मिलाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरने काही महिन्यांपूर्वी आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती. त्यांनतर तिने आपल्या बेबी बंपचा फोटो शेयर केला होता.यानंतर डोहाळे जेवणाचे फोटोही तिने शेअर केले होते.  प्रेग्नेन्सीच्या नऊ महिन्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद तिने घेतला आणि अखेर ती ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करत होती, तो क्षणही आला.

आपल्या बेबी बंपच्या फोटोंवरून सोशल मीडियावर उर्मिला ट्रोल झाली होती. त्यावर तिने सडेतोड उत्तरदेखील दिले होते. उर्मिला निंबाळकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून विविध मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दिया और बाती, मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेत तिने काम केले आहे. उर्मिलाची छोट्या पडद्यावरील  दुहेरी ही मालिका चांगलीच गाजली होती.  उर्मिलाने पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फॅशन डिझायनरचे शिक्षण घेतले.  तिने एक तारा, हायवे आणि सनई चौघडे यांसारख्या चित्रपटात देखील काम केले आहे. 

Web Title: marathi actress urmila nimbalakar blessed with baby boy