​दुहेरी मालिकेमध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 14:27 IST2017-07-18T08:57:08+5:302017-07-18T14:27:08+5:30

स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या ...

Is Mamata back in the double series that Sonia? | ​दुहेरी मालिकेमध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?

​दुहेरी मालिकेमध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?

टार प्रवाहच्या 'दुहेरी' या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेच्या कथानकाला आता वेगळेच वळण मिळालेले आहे. मैथिलीचा खून झाल्यानंतर अल्पावधीतच तिच्यासारखीच दिसणारी मुलगी सूर्यवंशी कुटुंबात आली आहे. ती स्वत: सोनिया कारखानीस असल्याचे सांगत असली, तरी ती खरी कोण आहे, यावर सूर्यवंशी कुटुंबाचा विश्वास बसलेला नाही. ती कोण आहे याचा उलगडा या मालिकेत लवकर होणार असल्याचे कळत आहे. 
बल्लाळ आणि परसूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या मैथिलीला परसूने संपवले. खूनानंतर त्याने तिला लगेच जमिनीत पुरलेदेखील होते. मैथिली गेल्याची बातमी सूर्यवंशी कुटुंबाला कळल्यानंतर त्यांना चांगलाच धक्का बसला. या धक्क्यातून ते स्वतःला सावरत असतानाच मैथिलीच्या मृत्युच्या तेराव्या दिवशीच मैथिली सारखीच दिसणारी मुलगी घरात दाखल झाली. आता ही नेमकी कोण, मैथिली की सोनिया असा संभ्रम सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ही मुलगीच मैथिली आहे असे सगळ्यांना वाटत होते. पण तिने आपण सोनिया कारखानीस असल्याचे पुरावेही दिले. मात्र, नेहाला तिचे म्हणणे अजिबात पटलेले नाही. तिच्या वागण्या-बोलण्यातून ती मैथिली असल्याची नेहाची भावना आहे. त्यामुळे आता परतलेली व्यक्ती कोण आहे, ती मैथिली आहे की सोनिया असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. जर ती मैथिली नसून ती सोनिया असेल तर सूर्यवंशी कुटुंबात असे अचानकपणे ती येण्यामागचे कारण काय हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच दुहेरी या मालिकेत मिळणार आहेत.

Also read : आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी केले 'दुहेरी'चे 2डी कोलाज

Web Title: Is Mamata back in the double series that Sonia?