"जरा सांभाळून ..." हास्यजत्रा फेम नम्रताच्या व्हिडिओवर प्रसाद खांडेकरची मजेशीर कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 15:24 IST2024-07-05T15:19:02+5:302024-07-05T15:24:41+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध आहे.

"जरा सांभाळून ..." हास्यजत्रा फेम नम्रताच्या व्हिडिओवर प्रसाद खांडेकरची मजेशीर कमेंट
Namrta Sambherao Viral Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध आहे. आपल्या सदाबहार अभिनयाने तिने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. अलिकडेच हास्यजत्रेची लॉली चर्चेत आली होती. नम्रताने तिच्या गावाकडील शेतात टुमदार बंगला बांधला आहे. तिची स्वप्नपूर्ती झाली आहे. पण सध्या सोशल मीडियावर नम्रता संभेरावच्या एका व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा रंगत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधील अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव ही जोडी कायमच चर्चेत येत असते. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नम्रता सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही नम्रता चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते.
नुकताच नम्रता ने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यावर प्रसाद खांडेकरने केलेल्या कमेंटने नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे. व्हिडिओमध्ये नम्रता नीती मोहनच्या 'तू हैं तो' या गाण्यावर थिरकताना दिसतेय. त्यावर गमतीशीर प्रतिक्रिया देत प्रसादने म्हटलंय, "नाय ते सगळं ठिकाय पण एवढं गोल फिरलीस तर चक्कर बिक्कर यायची बाय ...जरा सांभाळून चकरा मार". शिवाय अभिनेत्री प्रार्थना बेहरेने व्हिडिओवर 'Beautiful' अशी कमेंट केल्याचं पाहायला मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये नम्रताने पांढऱ्या रंगाची घागरा चोळी परिधान केली आहे. शिवाय त्यावर पिवळी ओढणी तिने घेतली आहे. या व्हायरल व्हिडिओवर नम्रताने 'Blessed' असं कॅप्शन लिहलं आहे.