किर्ती बनणार निकितनची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 12:00 IST2016-05-16T06:30:45+5:302016-05-16T12:00:45+5:30

अभिनेत्री किर्ती नागपुरे वर्षभरानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘नागार्जुन’ या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारणार आहे. वर्षभरानंतर मालिकेत ...

Kirti to become Nikita's wife | किर्ती बनणार निकितनची पत्नी

किर्ती बनणार निकितनची पत्नी

िनेत्री किर्ती नागपुरे वर्षभरानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘नागार्जुन’ या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारणार आहे. वर्षभरानंतर मालिकेत कमबॅक करत असल्याने ती या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. पण सुरुवातीला या मालिकेत काम करू की नको याबद्दल ती द्विधा मनस्थितीत होती. कारण या मालिकेत अभिनेता निकितन धीर तिच्या पतीची भूमिका साकारत होता. निकितनची उंची जवळजवळ सहा फूट आहे तर किर्ती ही जेमतेम पाच फुट उंचीची आहे. त्यामुळे आमची जोडी चांगली दिसणार नाही. मी त्याची मुलगी शोभेल असे किर्तीला वाटत होते. पण या भूमिकेसाठी तीच योग्य असल्याचे प्रोडक्शन हाऊसने तिला पटवून दिले, त्यामुळेच तिने मालिकेसाठी होकार दिला असे ती सांगते.

Web Title: Kirti to become Nikita's wife