सलमानपेक्षा महेश मांजकेरांनीच हिंदी बिग बॉसला करावं होस्ट,जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 05:17 PM2021-11-22T17:17:34+5:302021-11-22T17:20:18+5:30

सोशल मीडियावर सलमानपेक्षा महेश मांजरेकरच श्रेष्ठ अशा चर्चा रंगत आहेत.

Instead of Salman Khan, Mahesh Manjrekar Should host Hindi Big Boss, know The Reason why | सलमानपेक्षा महेश मांजकेरांनीच हिंदी बिग बॉसला करावं होस्ट,जाणून घ्या कारण

सलमानपेक्षा महेश मांजकेरांनीच हिंदी बिग बॉसला करावं होस्ट,जाणून घ्या कारण

googlenewsNext

बिग बॉस हा रिएलिटी शो गेल्या काही वर्षात प्रचंड गाजला आहे. बिग बॉस हिंदीला मिळालेल्या यशामुळेच मराठीत हा शो सुरु करण्यात आला. सलमान खानच्या खास शैलीमुळे हा शो प्रचंड हिट ठरला. तर मराठीत महेश मांजेरकर या शोला होस्ट करत आहेत. हिंदी प्रमाणेच मराठीतही या शोची प्रचंड चर्चा रंगत असते. 

घरात होणारे वाद यामुळे हा शो चर्चेचा विषय ठरतो. हिंदी आणि मराठी दोन्ही शोला प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आता रसिक सलमान व्हर्सेस महेश मांजरेकर अशीही तुलना करु लागले आहेत. मुळात सलमानपेक्षा महेश मांजरेकराचं होस्ट करणं चाहत्यांना अधिक आवडते. ते कधीच एकाची बाजु घेत नाही. प्रत्येकाची चूक लक्षात आणून देत योग्य तो निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे हिंदी बिग बॉसलाही महेश मांजरेकर यांनीच शोला होस्ट करावे अशी इच्छा चाहते व्यक्त करताना दिसत आहेत. 

 

सोशल मीडियावर सलमानपेक्षा महेश मांजरेकरच श्रेष्ठ अशा चर्चा रंगत आहेत. सलमानला कमी पसंती मिळत असून महेश मांजरेकर यांना अधिक पसंती मिळत आहे. चाहतेही सलमान व्हर्सेस महेश मांजरेकर अशी तुलना करता दिसत आहेत. सोशल मीडियावर हिंदी प्रेक्षकसुद्धा मराठी बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकरांनाच पसंती देत आहेत. महेश मांजेकर यांचे कौतुकही करत आहेत. सूत्रसंचालकाने कसे असावे तर महेश मांजरेकर सारखे असावे त्यांनी हे 
त्यांनी उत्तमरित्या सिद्ध करुन दाखवले असल्याचे रसिक म्हणत आहेत. 

'बिग बॉस 15' महेश मांजरेकरसोबत सलमान खान सर्व सदस्यांचा क्लास घेताना दिसले.बिग बॉस 15 चा वीकेंड का वार एपिसोड खूप हिट ठरला. महेश मांजरकेर यांनी स्पर्धकांमध्ये झालेला गैरसमज दूर केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी कोण्या एकाची बाजु घेतली नाही. प्रत्येकाची बाजु समजूनच आपले मतं मांडताना दिसले. त्यामुळे हिंदी रसिकांनीसुद्धा सलमानपेक्षा महेश मांजेरकर यांनाच अधिक पसंती दिली आहे. 

Web Title: Instead of Salman Khan, Mahesh Manjrekar Should host Hindi Big Boss, know The Reason why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.