कुर्रर्रर्रर्र! थाटात पार पडलं मराठमोळ्या गायिकेच्या लेकाचं बारसं; हटके नावांच्या ट्रेंडमध्ये मुलाचं ठेवलं 'हे' सुंदर नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:39 IST2026-03-12T16:38:28+5:302026-03-12T16:39:38+5:30
लोकप्रिय गायिकेनं जाहीर केलं बाळाचं नाव, होतोय कौतुकाचा वर्षाव;दाखवली चिमुकल्याची पहिली झलक

कुर्रर्रर्रर्र! थाटात पार पडलं मराठमोळ्या गायिकेच्या लेकाचं बारसं; हटके नावांच्या ट्रेंडमध्ये मुलाचं ठेवलं 'हे' सुंदर नाव
Sayli kamble Post: लोकप्रिय म्युझिक रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल या शोचे जगभरात चाहते आहेत.जवळपास १९ वर्षापूर्वी या शोचं पहिलं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या शोमुळे अनेक नवे चेहरे प्रसिद्धीझोतात आले. अनेकांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं.त्यापैकीच एक नाव म्हणजे गायिका सायली कांबळे. सध्या सायली कांबळे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
‘इंडियन आयडल’च्या १२ व्या सीझनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सायली कांबळेने काही महिन्यापूर्वीच प्रेक्षकांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली होती.१२ डिसेंबर २०२५ रोजी या गायिकेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. आता लेकाच्या जन्मानंतर ३ महिन्यांनी गायिकेचं लेकाचं नामकरण केलं आहे. सायली आणि तिचा पती धवलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकाचं नाव जाहीर केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक गोंडस फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये सायली आणि तिचा पती या मुलाचा हात धरलेले दिसत आहेत.
गायिकेच्या लेकाचं नाव आहे खूपच सुंदर...
गायिका सायली कांबळेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलंय,"वेद धवल सायली पाटील'...तीन महिन्यांपूर्वी, एक लहानसा जीव आमच्या आयुष्यात आला आणि त्याने आमचं आयुष्याची नवीन कहाणी सुरुवात झाली. ज्ञानाने प्रेरित एक नाव. प्रेमाने भरलेलं जीवन... असा एक प्रवास नुकताच सुरू झाला आहे.आज, आम्ही ते नाव उघड करत आहोत... ज्या नावाने आम्ही नेहमीच हाक मारत आलो आहोत.वेद...", अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे. वेद नावाचा अर्थ ज्ञान, बुद्धी,पवित्र शास्त्र किंवा जाणून घेणं असा होतो.हिंदू धर्मात या नावाला फार मोठं महत्त्व आहे. दरम्यान, चाहते आणि सेलिब्रिटी सायली आणि तिचा पती धवलच्या या पोस्टवर कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत.
'इंडियन आयडल १२'ची यशस्वी स्पर्धक
सायली कांबळे 'इंडियन आयडल १२' च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती. तिचा सुंदर आवाज आणि कमाल सादरीकरणाबद्दल तिचे खूप कौतुक झाले होते. सायलीच्या 'खटूबा' गाण्याला शोमध्ये पाहुण्या परीक्षक म्हणून आलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी विशेष दाद दिली होती.