'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 08:58 AM2024-05-22T08:58:03+5:302024-05-22T08:58:38+5:30

Nilesh sable: 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. यामध्येच आता निलेशनेदेखील कलाकारांविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

hastay-na-hasaylach-pahije-cast-playing-cricket-on-set-dr-nilesh-sable-is-not-happy-with-it-video-viral | 'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे

'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे

'चला हवा येऊ द्या' या गाजलेल्या कार्यक्रमानंतर डॉ. निलेश साबळे (dr. nilesh sable)  याने 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' हा नवा कार्यक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. यात बऱ्याचदा त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. यामध्येच निलेशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने स्वत:च्या सहकलाकारांना उद्देशून खोचक टोला लगावला आहे. या लोकांना लिखाण म्हणजे खेळ वाटतो, असं त्याने म्हटलं आहे.

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर या कार्यक्रमातील बरेच कलाकार इतरत्र विखुरले आहेत. यातील निलेश साबळे, भाऊ कदम, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण हसताय ना.. या नव्यामध्ये दिसत आहेत. या कार्यक्रमात त्यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजणे आणि सुपर्णा श्याम यांचीही जोड मिळाली आहे. यात सुपर्णाने तिच्या इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाच्या सेटवरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

सुपर्णाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या कार्यक्रमातील कलाकार आणि क्रू मेंबर्स सगळे जण क्रिकेट खेळत आहेत. तर, दुसरीकडे डॉ. निलेश साबळे त्याच्या काही अन्य सहकलाकारांसोबत मिळून कार्यक्रमासाठीचं लिखाण करत आहे. या व्हिडीओमध्ये कलाकार आणि इतर टीम मेंबर ज्या पद्धतीने सेटवर टाइमपास करतायेत ते पाहून निलेश वैतागला आहे. त्यामुळेच जो मस्करीच्या स्वरुपात त्यांना टोमणा मारतो.

'...आणि कलाकारांचं म्हणणं असतं की पॅकअप लवकर झालं पाहिजे. त्यांना लिखाण म्हणजे खेळ वाटतो,' असं निलेश या व्हिडीओमध्ये म्हणतो. सोबतच तो वैतागल्याचंही दिसून येतं.

Web Title: hastay-na-hasaylach-pahije-cast-playing-cricket-on-set-dr-nilesh-sable-is-not-happy-with-it-video-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.