​हेली शाह बनणार देवांशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 15:18 IST2017-02-15T09:48:29+5:302017-02-15T15:18:29+5:30

देवांशी ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेत अनेक नवीन एंट्री पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत देवांशी ही ...

Haley Shah will become Devanshi | ​हेली शाह बनणार देवांशी

​हेली शाह बनणार देवांशी

वांशी ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेत अनेक नवीन एंट्री पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत देवांशी ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची असल्याने लीपची घोषणा झाल्यापासून ही भूमिका कोण साकारणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली होती. आता ही भूमिका हेली शाह साकारणार आहे. हेली शाहने याआधी गुलाल, स्वरांगी, खेलती है जिंदगी आँख में चोली यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झलक दिखला जा या कार्यक्रमातदेखील तिने भाग घेतला होता. 
देवांशी या मालिकेत देवांशीच्या हुंडीत पडलेल्या लहान मुलीची कथा आपल्याला पाहायला मिळाली होती. देवांशीच्या हुंडीत पडल्याने त्या मुलीलादेखील देवांशीचे आयुष्य जगावे लागते असे दाखवण्यात आले होते. या मालिकेत सात वर्षांच्या मुलीची कथा आपल्याला पाहायला मिळाली होती. आता ही मालिका 14 वर्षांचा लीप घेणार असून देवांशी मोठी झालेली दाखवली जाणार आहे. देवांशी या मालिकेत काम करण्यासाठी हेली शाह खूप उत्सुक आहे. या मालिकेविषयी हेली सांगते, "देवांशी या मालिकेची कथा मला प्रचंड आवडली. ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका लवकरच लीप घेणार असून लीपनंतर देवांशीचे तरुणपण या मालिकेत दाखवले जाणार आहे. देवांशीची लहानपणीची भूमिका काशवी कोठारीने साकारली होती. तिच्या अभिनयाने आणि तिच्यात असलेल्या गोडव्याने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. तिने देवांशी ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारली असल्याने देवांशी या व्यक्तिरेखेकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन आणि लोक मला या भूमिकेत स्वीकारतील अशी मला आशा आहे. 


Web Title: Haley Shah will become Devanshi