गुरमीत चौधरीने का दिला पौराणिक मालिकेत काम करण्यासाठी नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2016 02:09 PM2016-11-21T14:09:22+5:302016-11-21T14:21:10+5:30

गुरमित चौधरीने रामायण या मालिकेतील राम या व्यक्तिरेखेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील त्याने साकाारलेला राम प्रेक्षकांना प्रचंड ...

Gurmeet Chaudhary refused to work in the mythological series | गुरमीत चौधरीने का दिला पौराणिक मालिकेत काम करण्यासाठी नकार

गुरमीत चौधरीने का दिला पौराणिक मालिकेत काम करण्यासाठी नकार

googlenewsNext
रमित चौधरीने रामायण या मालिकेतील राम या व्यक्तिरेखेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील त्याने साकाारलेला राम प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. पण यापुढे पौराणिक मालिकांमध्ये काम न करण्याचे त्याने ठरवले आहे. 
रामायण या मालिकेनंतर गीत-हुई सबसे पराई, पुनर्विवाह यांसारख्या मालिकांमधून त्याने इमेज बदलण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वजह तुम हो या चित्रपटात तर गुममितचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. एक सेक्सी अभिनेता म्हणून या चित्रपटाद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच्या या नव्या इमेजमध्ये तो प्रचंड खूश असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

Gurmeet Choudhary and Sana Khan in Wajah Tum Ho 

गुरमित चौधरी पौराणिक मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला. पण आज काहीही झाले तरी पौराणिक मालिकांमध्ये काम करायचे नाही असे त्याने ठरवले असल्याचे कळतेय. गुरमितने राम ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारली होती. त्यामुळे त्याने भविष्यातदेखील अशी भूमिका साकारावी असे अनेक निर्मात्यांना वाटत आहे. त्यामुळे त्याला आतापर्यंत दोन निर्मात्यांनी पौराणिक मालिकांसाठी विचारले आहे. पण या दोन्ही मालिका करण्यासाठी त्याने नकार दिला आहे. एकाच प्रकारच्या भूमिका साकारायची इच्छा नसल्याने गुरमितने पौराणिक मालिकेत काम करायचे नाही असा निर्णय घेतला आहे. याविषयी गुरमित सांगतो, "मला रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारायला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आज या मालिकेला इतकी वर्षं झाली असली तरी लोक मला राम या भूमिकेमुळेच ओळखतात. मला भेटल्यावर माझ्याशी याविषयीच बोलतात. राम ही भूमिका पौराणिक मालिकांमधील सगळ्यात महत्त्वाची भूमिका मानली जाते. त्यामुळे ही भूमिका मी साकारल्यानंतर प्रेक्षक मला दुसऱ्या कोणत्या भूमिकेत स्वीकारू शकतील असे मला वाटत नाही. त्यामुळे मी पौराणिक मालिकांपासून दूर राहाणेच पसंत केले आहे." 

cnxoldfiles/a> मध्ये सांगितले होते. गुरमित काय म्हणाला होता हे जाणून घ्या.

Web Title: Gurmeet Chaudhary refused to work in the mythological series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.