डिम्पी गांगुलीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 12:54 IST2017-01-04T12:54:10+5:302017-01-04T12:54:10+5:30

डिम्पी गांगुलेने काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीचा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला होता. पण या फोटोत डिम्पीच्या मुलीचा चेहराच ...

The girl's first photo was shared by Dimpy Ganguly | डिम्पी गांगुलीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो

डिम्पी गांगुलीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो

म्पी गांगुलेने काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीचा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला होता. पण या फोटोत डिम्पीच्या मुलीचा चेहराच दिसत नव्हता. पण नववर्षाच्या निमित्ताने तिने तिच्या फॅन्ससाठी तिच्या मुलीचा एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिची मुलगी रैना काहीतरी खात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

Dimpy Ganguly
या फोटोसोबत डिम्पीने ट्वीट करून म्हटले आहे की, माझ्या मुलीने वर्षाच्या पहिल्या दिवशी तिचे आयुष्यातील पहिले जेवण जेवले आहे. 2017 या वर्षाची यापेक्षा चांगली सुरुवात काही होऊच शकत नाही. तसेच डिम्पीने तिचा आणखी एक फोटो पोस्ट करून सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटोसोबत ट्वीट करून म्हटले आहे की, रैनाकडून माझ्या आईच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

Dimpy Ganguly
तसेच डिम्पीने म्हटले आहे की, 2016 हे वर्षं जरी मला काहीसे खडतर गेले असले तरी या वर्षात माझी मुलगी माझ्या आयुष्यात आली. त्यामुळे हे वर्षं माझ्यासाठी खूप खास आहे आणि 2017साठी मी तयार आहे.
डिम्पीच्या मुलीला पाहाण्याची तिच्या फॅन्सची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. डिम्पीने काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. पण या फोटोत तिच्या मुलीचा चेहराच दिसत नव्हता. त्यामुळे तिच्या चाहत्यांची निराशा झाली होती. तसेच तिने तिच्यासोबत तिच्या मुलीचा आणखी एक फोटोदेखील अपलोड केला होता.
पण या फोटातही ती व्यवस्थित दिसत नव्हती. डिम्पीची मुलगी आता सहा महिन्याची झाली असून थोडीशी बोलायलादेखील लागली आहे. 
डिम्पीने 2015मध्ये रोहित रॉय या व्यवसायिकासोबत लग्न केले. लग्नानंतर ती दुबईत स्थायिक झाली आहे. रोहितसोबत लग्न करण्याआधी डिम्पीचे लग्न राहुल महाजनसोबत झाले होते. राहुल का स्वयंवर या रिअॅलिटी शोमध्ये राहुलने डिम्पीची त्याची पत्नी म्हणून निवड केली होती. पण लग्नानंतर राहुल तिला प्रचंड मारतो असा आरोप तिने त्याच्यावर वारंवार केला. त्यानंतर काहीच महिन्यात त्या दोघांनी घटस्फोट घेतला. 



Web Title: The girl's first photo was shared by Dimpy Ganguly