'इश्कबाज' मालिकेत शिवाय अनिकाची लव्हस्टोरी रसिकांना वाटतेय रटाळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 12:56 IST2017-01-04T12:56:10+5:302017-01-04T12:56:10+5:30

रसिकांनी मालिकेशी खिळवून ठेवण्यासाठी  इश्कबाज या मालिकेत आणखी एक नवी ट्वीस्ट आला आहे.अनिका आणि शिवाय या दोघांकडे कोणताच पर्याय ...

In the 'flick' series, Anika's love story looks like rattles? | 'इश्कबाज' मालिकेत शिवाय अनिकाची लव्हस्टोरी रसिकांना वाटतेय रटाळ?

'इश्कबाज' मालिकेत शिवाय अनिकाची लव्हस्टोरी रसिकांना वाटतेय रटाळ?

िकांनी मालिकेशी खिळवून ठेवण्यासाठी  इश्कबाज या मालिकेत आणखी एक नवी ट्वीस्ट आला आहे.अनिका आणि शिवाय या दोघांकडे कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे इच्छा नसतांनाही शिवायला अनिकाशी लग्न करावे लागले. कुटुंबाचाच्या फोर्समुळे शिवायला अनिकाशी लग्न करावे लागले.मात्र या लग्नामुळे दुरावलेले हे दोघेही पुन्हा जवळ येऊ लागले आहेत. हा ट्वीस्ट संपत नाही तोपर्यंत तिस-याच्या एंट्रीने मालिकेत नवनवीन गोष्टी रसिकांना पाहयला मिळत आहेत.टीयाने बेरॉय फॅमिलीशी असलेल्या जुन्या दुश्मनीचा बदला घ्यायचाय ठरवलंय.त्यामुळे टीया तिच्या बहिणींसह ओबरॉय फॅमिलीसह राहत घरात कटकारस्थानं रचतेय.टीया आणि अनिकाचे बे-याच वेळा काही गोष्टींमुळे खटके उडत असल्याचे यारपूर्वीही रसिकांनाही पाहिलंय.मात्र टीयाला तिच्या बहिणी याकडे दुर्लक्ष करायला सागंतात तरीही टीया काही न ऐकता वेगवेगळे कट रचतेय.



नुकत्याच झालेल्या भागात शिवायमुळे टीयाने रचलेला प्लॅन फेल होतो आणि त्यात अनिका बचावते असा काही खास गोष्टी पाहायला मिळाल्या.टीनाने शिवाय आणि अनिका यांच्या धोगांमध्ये दुरावा निर्माण करण्याच खूप प्रयत्न केला.मात्र वेळोवेळी टीयाचा प्लॅन फोल ठरला. तर दुसरीकडे आणखी एक प्रेमकथा फुलताना दिसतेय. सगळ्या घडलेल्या प्रकरावारून सौम्या रूद्रला सांगते की,प्रत्येक मुलीची आपल्या पतीने आपली सुरक्षा करावी हीच अपेक्षा असते.त्यात रौद्र सौम्याला सांगतो की तिच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो तिच्या पाठीशी खंबीर उभा राहणार. हे ऐकताच सौम्याचे रौद्रविषयी विचार बदतात.त्यामुळे दोघांमध्ये एक लव्हट्रॅक सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.मालिकेत सध्या फक्त शिवाय आणि अनिका यांच्यावरच जास्त फोकस करण्यात येत होते कुठेतरी मालिकेतही तोच तोपणा जाणवात होता. मात्र आता  येणा-या भागात अशाच नवीन रंजक गोष्टी 'इश्कबाज'मध्ये पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: In the 'flick' series, Anika's love story looks like rattles?