​कुत्र्याविषयी भीती झाली दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 15:23 IST2016-09-09T09:53:27+5:302016-09-09T15:23:27+5:30

नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत नूरीची भूमिका साकारणाऱ्या पूजा बॅनर्जीला कुत्र्यांची खूपच भीती वाटते. लहानपणापासून ती कुत्र्याच्या जवळही ...

The fear of the dog was far away | ​कुत्र्याविषयी भीती झाली दूर

​कुत्र्याविषयी भीती झाली दूर

गार्जुन - एक योद्धा या मालिकेत नूरीची भूमिका साकारणाऱ्या पूजा बॅनर्जीला कुत्र्यांची खूपच भीती वाटते. लहानपणापासून ती कुत्र्याच्या जवळही जात नाही आणि त्याच्यात तिच्या एका मैत्रिणीला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावल्यामुळे तिची कुत्र्यांविषयी असलेली भीती अधिक वाढली आहे. कुत्र्याला घाबरत असतानाही तिने नुकतेच एक दृश्य कुत्र्यासोबत चित्रित केले. याविषयी पूजा सांगते, "चित्रीकरणाच्या काही वेळ आधीच कुत्र्यासोबत चित्रीकरण करायचे आहे असे मला सांगण्यात आले. त्यामुळे चित्रीकरण सुरू व्हायच्याआधीच मी मनाची तयारी केली. काहीही होणार नाही, तू घाबरू नकोस असे सतत मी माझ्या मनाला समजवत होते. कुत्र्याच्या प्रशिक्षकानेही मला मानसिक आधार दिला. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी कुत्रा माझ्या जवळ आला. त्याने माझ्या अंगावर उडी मारली, मला चाटले, हुंगले. मी त्यावेळी एखाद्या पुतळ्यासारखी शांत बसून होते. पण नंतर मी त्याला बिस्किटे खायला दिली. दृश्य चित्रीत करताना मी घाबरलेली आहे हे मला कुठेच जाणवू द्यायचे नव्हते. त्यामुळे मी हसत हे दृश्य पूर्ण केले. पण या दृश्यानंतर माझ्या मनात कुत्र्यांविषयी असलेली भीती दूर झाली." 

Web Title: The fear of the dog was far away