​कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम एरिका फर्नांडिस आणि शाहीर शेख खऱ्या आयुष्यातही बेस्ट फ्रेंड्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 13:05 IST2017-03-27T07:35:54+5:302017-03-27T13:05:54+5:30

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत शाहीर शेख देव तर एरिका फर्नांडिस सोनाक्षी ही भूमिका साकारत आहे. ...

Fame Erica Fernandes and Shahir Sheikh also have some love for some color love, even the best friends in real life | ​कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम एरिका फर्नांडिस आणि शाहीर शेख खऱ्या आयुष्यातही बेस्ट फ्रेंड्स

​कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम एरिका फर्नांडिस आणि शाहीर शेख खऱ्या आयुष्यातही बेस्ट फ्रेंड्स

छ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत शाहीर शेख देव तर एरिका फर्नांडिस सोनाक्षी ही भूमिका साकारत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत या मालिकेतील देव आणि सोनाक्षीच्या केमिस्ट्रीचे प्रेक्षक नेहमीच कौतुक करत असतात. या मालिकेत या दोघांची प्रेमकथा प्रेक्षकांना सुरुवातीच्या काळात पाहायला मिळाली होती. पण आता त्या दोघांमध्ये भांडणे झाली असल्याचे दाखवण्यात आली आहेत. हे दोघे मालिकेत जरी भांडत असले तरी खऱ्या आयुष्यात हे दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत.
शाहीर शेख या मालिकेसोबतच इंडोनेशियातील एका मालिकेत काम करत आहे आणि या मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी तो महिन्यातून काही दिवस तरी इंडोनेशियाला जातो. नुकताच तो त्याच्या कामासाठी बाहेरगावी विमानने चालला होता. त्यावेळी त्याला विमानात एक खूप छान सरप्राइझ मिळाले. शाहीरचा नुकताच वाढदिवस झाला. हा वाढदिवस विमानात खूप चांगल्याप्रकारे साजरा करण्यात आला. विमानातील कर्मचाऱ्यांनी शाहीरसाठी केक आणला होता. शाहीरला याची काहीच कल्पना नसल्याने तो प्रचंड खूश झाला. एवढेच नव्हे तर एका व्हिडिओद्वारे त्याच्या बहिणीने, भाचीने आणि आईवडिलांनी त्याला विश केले. हा व्हिडिओ शाहीरला प्रचंड आवडल्याने त्याने तो लगेचच इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तो व्हिडिओ शेअर करत असताना कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेतील त्याची सहकलाकार एरिका फर्नांडिसचे आभार मानले. हा व्हिडिओ बनवण्यासाठी एरिकाने प्रचंड मेहनत घेतली होती. एरिकामुळेच शाहीरचा हा वाढदिवस खूप स्पेशल ठरला. 


Web Title: Fame Erica Fernandes and Shahir Sheikh also have some love for some color love, even the best friends in real life