Shocking: दहशतीत आहे जसलीन मथारूचे कुटुंब, कॉलरने दिली सर्वांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 10:44 AM2020-03-19T10:44:18+5:302020-03-19T10:44:25+5:30

जाणून घ्या काय आहे प्रकरण

ex-bigg boss contestant jasleen matharu parents got extortion call-ram | Shocking: दहशतीत आहे जसलीन मथारूचे कुटुंब, कॉलरने दिली सर्वांना जीवे मारण्याची धमकी

Shocking: दहशतीत आहे जसलीन मथारूचे कुटुंब, कॉलरने दिली सर्वांना जीवे मारण्याची धमकी

googlenewsNext
ठळक मुद्देजसलीन मथारू नुकतीच ‘मुझसे शादी करोगे’ या शोमध्ये दिसली होती. त्याआधी ‘बिग बॉस’च्या 12 व्या सीझनमुळे ती चर्चेत आली होती.

‘बिग बॉस’ आणि पाठोपाठ ‘मुझसे शादी करोगे’ या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री जसलीन मथारू हिचे वडिल केसर मथारू यांना धमकीचे फोन येत आहेत. केसर मथारू यांनी यासंदर्भात मुंबईच्या ओशीवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जसलीन मथारूच्या वडिलांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘होय, जसलीनला नाही तर मला गेल्या काही दिवसांपासून  धमकीचे फोन येत आहेत. मला व माझ्या कुटुंबाला ठार मारू, अशा धमक्या मला मिळत आहेत. एकदा नाही तर अनेकदा मला धमक्यांचे फोन आलेत. मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे,’ असे केसर मथारू यांनी सांगितले.


ओशीवारा पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मथारूंची तक्रार आम्ही नोंदवून घेतली. आमचा तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले. तथापि यासंदर्भात आणखी तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. या संपूर्ण प्रकारामुळे मथारू कुटुंब सध्या घाबरलेले आहे. मात्र जसलीनने अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जसलीन मथारू नुकतीच ‘मुझसे शादी करोगे’ या शोमध्ये दिसली होती. त्याआधी ‘बिग बॉस’च्या 12 व्या सीझनमुळे ती चर्चेत आली होती. ‘बिग बॉस 12’मध्ये जसलीनने भजन सम्राट अनुप जलोटा यांच्यासोबत एन्ट्री घेतली होती. विशेष म्हणजे, एन्ट्रीलाच या जोडीने सर्वांना आश्चयार्चा धक्का दिला होता.

होय, आम्ही  एकमेकांचे गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड असे सांगत अनुप जलोटा व जसलीन मथारू यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. अर्थात घरातून बाहेर पडल्यानंतर हा सगळा ड्रामा होता हे सिद्ध झाले होते. 

Web Title: ex-bigg boss contestant jasleen matharu parents got extortion call-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.