शूटींग दरम्यान स्वरजाने चक्क 11 मोदक केले फस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 17:02 IST2016-11-03T16:48:37+5:302016-11-03T17:02:18+5:30

मोदक हा आपल्या लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य हे सा-यांनाच माहिती आहे. मात्र छोटया पडद्यावर गणपती बाप्पाची भूमिका साकारणार स्वराजलाही ...

During the shooting, 11 elephant masters were furious! | शूटींग दरम्यान स्वरजाने चक्क 11 मोदक केले फस्त !

शूटींग दरम्यान स्वरजाने चक्क 11 मोदक केले फस्त !

दक हा आपल्या लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य हे सा-यांनाच माहिती आहे. मात्र छोटया पडद्यावर गणपती बाप्पाची भूमिका साकारणार स्वराजलाही मोदक खूप आवडतात. म्हणूनच सेटवर मालिकेत मोदक खाण्याचा सिक्वेन्स शूट होत असताना त्याने शूटिंग दरम्यान चक्क 11 मोदक फस्त केले. शूटिंग करताना वेगवेगळ्या प्रकारच्या शॉटस घेण्यात येत होते त्यावेळी त्याला दरवेळी मोदक खात शॉट द्यावा लागत होता. यादरम्यान कधी त्याने 11 मोदक संपवले हे त्याला देखील कळले नाही. गणपती बाप्पा मोरयामध्ये पार्वतीला मनसाचे सत्य कळल्यानंतर गणेश आणि शंकर या दोघांवरही रागावली होती. परंतु पार्वतीचा लाडका पुत्र गणेश याने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नात्यांमध्ये आलेला दुरावा आपल्या प्रेमळ स्वभावाने दूर केला आहे. आता गणेश, पार्वती आणि शंकर कार्तिकेय यांच्यात कुठल्याही प्रकारचे कटुता राहिलेली नाही.पार्वती गणेशाच्या या प्रयत्नांमुळे खूपच खुश असल्यामुळे पार्वतीने गणरायासाठी ११ मोदक आणले. ते मोदक बघून अर्थातच गणू बाप्पाला आनंद झाला.

Web Title: During the shooting, 11 elephant masters were furious!