धनश्री काडगावकर दिसणार शर्वरीच्या भूमिकेत; वहिनीसाहेबांची स्टार प्रवाहच्या मालिकेत दमदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 15:39 IST2026-05-09T15:38:36+5:302026-05-09T15:39:03+5:30

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धनश्रीची स्टार प्रवाहच्या मालिकेत वर्णी लागली आहे.

Dhanashree Kadgaonkar to play important role in star pravah gharogari matichya chuli serial | धनश्री काडगावकर दिसणार शर्वरीच्या भूमिकेत; वहिनीसाहेबांची स्टार प्रवाहच्या मालिकेत दमदार एन्ट्री

धनश्री काडगावकर दिसणार शर्वरीच्या भूमिकेत; वहिनीसाहेबांची स्टार प्रवाहच्या मालिकेत दमदार एन्ट्री

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धनश्रीची स्टार प्रवाहच्या मालिकेत वर्णी लागली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत धनश्रीची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत धनश्री शर्वरी हे पात्र साकारताना दिसणार आहे. 

या पात्राबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, "मी जवळपास १-२ वर्षांनी पुन्हा एकदा मालिकेत काम करत आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही एक वेगळी उत्सुकता आहे. पण, स्टार प्रवाहच्या मालिकेत मला हे पात्र साकारण्याची संधी मिळतेय याचा खूप आनंद आहे. मी जेवढी उत्सुक आहे मला माहितीये तितकेच तुम्हीदेखील मला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक असाल. तेवढ्याच आनंदाने आणि प्रेमाने तुम्ही माझा स्वीकार कराल, अशी मी अपेक्षा करते". 


धनश्रीने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझिया प्रियाला प्रित कळेना',' रुंजी', 'जन्मगाठ', 'गंध फुलांचा गेला सांगून', 'तू चाल पुढं' या मालिकांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली. आता पुन्हा एकदा तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

Web Title : धनश्री काडगांवकर शर्वरी की भूमिका में; स्टार प्रवाह पर दमदार एंट्री

Web Summary : 'तुझ्यात जीव रंगला' से मशहूर धनश्री काडगांवकर, स्टार प्रवाह के 'घरोघरी मातीच्या चुली' में शर्वरी के रूप में वापसी कर रही हैं। ब्रेक के बाद वापसी से उत्साहित, धनश्री को दर्शकों के प्यार की उम्मीद है। उन्होंने पहले कई लोकप्रिय मराठी टीवी धारावाहिकों में काम किया है।

Web Title : Dhanashri Kadgaonkar to play Sharvari; a powerful entry on Star Pravah

Web Summary : Dhanashri Kadgaonkar, known for 'Tujhyat Jeev Rangala', returns to Star Pravah's 'Gharoghari Matichya Chuli' as Sharvari. Excited to be back after a break, Dhanashri hopes for the audience's love. She has previously acted in several popular Marathi television series.