"शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे", सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- "त्यांची इतकी भीती की.."

By देवेंद्र जाधव | Updated: June 27, 2025 11:20 IST2025-06-27T11:18:42+5:302025-06-27T11:20:16+5:30

'देवमाणूस' मालिकेतील सरु आजींना वयाच्या सत्तरीत अमाप प्रसिद्धी मिळाली. पण यासाठी त्यांना पतीचा विरोध पत्करावा लागला. अभिनेत्रीने खास किस्सा सांगितला आहे

devmanus Saru aaji actress rukmini sutar said of her husband's opposition to her acting | "शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे", सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- "त्यांची इतकी भीती की.."

"शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे", सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- "त्यांची इतकी भीती की.."

'देवमाणूस' मालिका खूप गाजली. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. 'देवमाणूस' मालिकेतील डॉक्टरने लोकांचं मन जिंकलंच पण सर्वात जास्त चर्चा झाली ती सरु आजींची. अभिनेत्री रुक्मिणी सुतार यांनी सरु आजींची भूमिका साकारली आहे. रुक्मिणी यांनी अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवली असली तरीही त्यांच्या पतीचा या गोष्टीला विरोध होता. इतकंच नव्हे, रुक्मिणी यांना पतीची खूप भीती वाटायची. एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला.

रुक्मिणी यांच्या पतीचा होता विरोध

रुक्मिणी सुतार यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केलाय. रुक्मिणी म्हणाल्या की, "नवऱ्याने पाठिंबा कधी दिलाच नाही. मुलांनी खूप पाठिंबा दिला. आधी पती खूप बोलायचे. पण आता त्यांना कळून चुकलं की, आता काय मी ऐकणार नाही. आता मी पार पुढे गेलेय. त्यामुळे ते आता काही बोलत नाहीत. आधी खूप बोलायचे. म्हणजे मला अक्षरशः इतकी भीती वाटायची की, जिथे तिथे सीन करताना ते समोर दिसायचे."


"त्यांना अजिबात आवडत नव्हतं. नाही जायचं, असं म्हणायचे. पण मी नाही सोडलं. मी हे करणार. काही झालं तरी चालेल. तुम्ही कितीही काही करा शेवटी मी जाणार म्हणजे जाणार. मला एकटं राहावं लागलं तरी चालेल, पण मी जाणार. मग त्यांना कळलं मी काय ऐकत नाही. मग ते काय बोलायचे नाहीत. मग नंतर त्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला.", अशाप्रकारे रुक्मिणी यांनी खुलासा केला. 'देवमाणूस - मधला अध्याय' ही मालिका सध्या सुरु आहे. या मालिकेत रुक्मिणी पुन्हा एकदा सरु आजींची भूमिका साकारत आहेत. मालिकेतील सरु आजींच्या म्हणींची खूप चर्चा होते. 

Web Title: devmanus Saru aaji actress rukmini sutar said of her husband's opposition to her acting